वढा जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ तथा मार्गदर्शन

वढा  जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ तथा मार्गदर्शन

 चंद्रपूर (प्रतिनिधी)-  
महाराष्ट्र नशाबंदी मंडळ महाराष्ट्र     जिल्हा शाखेच्या वतीने वढा  येथील जिल्हा  परिषद  उच्च प्राथमिक शाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
      नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व्यसनांमुळे होणारे आजार  याबाबत मार्गदर्शन  केले.
व्यसनमुक्तीची  शपथ देण्यात आली.  याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुदर्शन नैताम , सरपंच किशोर वरारकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
        वढा  येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विशेष श्रमसंस्कार  शिबिर सुरू आहे त्या निमित्ताने मुख्य चौकात व्यसनमुक्ती संदर्भात पोस्टर प्रदर्शनी लावण्यात आली होती. त्या पोस्टर प्रदर्शनीचे अवलोकन ग्रामस्थांनी केले.  तसेच व्यसनमुक्ती संदर्भात गावातील भिंतीवर घोषवाक्ये लिहिण्यात आली.  याकरिता  आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.  व्यसनमुक्तीच्या संदर्भात नवयुवकांना माहिती मिळावी म्हणून नशाबंदी मंडळ  जिल्हा शाखेच्या वतीने  जनजागृती मोहीम सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]