रेजा कुली कामगारांना मिळणार न्याय!

रेजा कुली कामगारांना  मिळणार न्याय!
चंद्रपुर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांचे समस्यांसंदर्भात आज दि.२१/०२/२०२४ रोजी चंद्रपुर महानगरपालिका आयुक्त मा.श्री. पालीवाल साहेबांच्या दालनात बैठक आयोजित कारण्यात आली होती यावेळी सदर बैठकीस उपस्थित राहुन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटनेचे प्रदेश सचिव श्री.अक्षय वाल्मीक व चंद्रपुर जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल महातव यांनी
चंद्रपुर महानगरपालिका मध्ये कार्यरत रेजा कुली(सफाई कामगार) यांना चंद्रपुर महानगरपालिका मध्ये वारस हक्काचे लाभ देत नाही या विषयाची गंभीर दखल घेत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटनेचे प्रदेश सचिव श्री.अक्षय वाल्मीक व चंद्रपुर जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल महातव यांनी चंद्रपुर महानगरपालिका आयुक्त मा.श्री. पालीवाल साहेबांना रेजा कुली(सफाई कामगार) यांना वारस हक्कासोबत ईतर सर्व लाभ देण्यात यावे याकरिता निवेदन दिले.
याप्रसंगी चंद्रपुर महानगरपालिके चे अतिरिक्त आयुक्त श्री.पाटील साहेब व संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गासोबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटनेचे प्रदेश सचिव श्री. सतिश असरेट,श्री.सोमेश्वर येलचलवार,
चंद्रपुर जिलहाध्यक्ष श्री.सुनिल महातव,कार्याध्यक्ष श्री.अरविंद बक्सरिया , श्री.शुभम कुंडाबोर,श्री.रितेश खोडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]