चला जाणूया वनाला' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची जंगल सफारी, पक्षी निरीक्षण, आणि मार्गदर्शन. .('सामाजिक वनीकरण' व 'स्वाब फाउंडेशन' यांच्या वतीने आयोजन)
तळोधी (बा.):
        सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण मार्गदर्शन व पर्यावरण संबंधित गोष्टी जाणून घेण्याकरिता प्रत्येक परिक्षेत्रामार्फत हरित सेना म्हणून नियुक्त केलेल्या प्रत्येक तालुक्यातील पाच शाळांच्या विद्यार्थ्यांना जंगलामध्ये घेऊन जाऊन 'चला जाणूया वनाला' या उपक्रमा अंतर्गत 'नेचर कॅम्प' आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानुसार भारत विद्यालय पळसगाव (जाट) व भारत विद्यालय नवरगाव येथील प्रत्येकी 40 विद्यार्थी व शिक्षक शिक्षिकांना सोबत घेऊन, संपूर्ण विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाची टोपी वाटप करून नंतर जंगल भ्रमंती व पक्षी निरीक्षण, वन्यजीव, पर्यावरण अभ्यास व नोंदी करून हा जंगल कॅम्प पुर्ण केला.


तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील निसर्गरम्य असा आलेवाही बीटातील 'काशी तलाव' या परिसरात सकाळी ६ ते १०:३० वाजेपर्यंत ५-६ कि.मी ची पायदळ तलावाभोवती भ्रमंती करून. जंगलातील बारकावे टिपत वाघांच्या पाऊलखुणांवरून ,अस्वल, बिबट यांच्या पाऊलखुणांवरून त्यांची ओळख. पक्ष्यांच्या आकारमान व दिसण्यावरून त्यांची ओळख. साप सापाच्या विविध प्रजाती त्यांची ओळख. विविध वृक्ष लागवड यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख पक्षी निरीक्षक रोशन धोत्रे चंद्रपूर, व अक्षय मेश्राम नागभीड यांनी पक्षांसंदर्भात बारकावे व स्थानांतरित पक्षी दाखवून मार्गदर्शन केले.
तर पाऊलखुणा ओळखणे, जंगलात वावरताना जंगलातील नियम व विविध प्राण्यांची ओळख व जंगलाचे महत्त्व यासंदर्भात स्वाब चे अध्यक्ष वन्यजीव अभ्यासक यश कायरकर यांनी परिसर भ्रमंती दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर सामाजिक वनीकरणाचे सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड यांनी पर्यावरणातील झाडे, त्यांचे संवर्धन कशा पद्धतीने करता येईल, व त्यांचे महत्त्व या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तर त्या संस्थेचे सर्पमित्र जीवेश सयाम यांनी सापाच्या विविध प्रजाती, सर्पदंश आणि सर्पदंश मागचे कारण, तसेच विषारी/ बिनविषारी सापांची ओळख कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.


यानंतर संपूर्ण ८० विद्यार्थी विद्यार्थिनींना व शिक्षक शिक्षिकांना वन जेवण देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करता स्वाब संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळेस स्वाब संस्थेच्या महिला विभाग प्रमुख कल्पना गेडाम ब्रह्मपुरी, स्वप्निल मेश्राम, छत्रपती रामटेके, भोलेनाथ सुरपाम, शुभम निकेशर, अमीर करकाडे, हितेश मुंगमोडे, महेश बोरकर, होमदेव दुधपचारे, अमन करकाळे, गिरीधर निकूरे, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करता परिश्रम घेतले. तर पंडित मेकेवार वनरक्षक आलेवाही, देवेंद्र ऊईके वन चौकिदार आलेला ही यांनी परिसर भ्रमंतीत सहकार्य केले. वनरक्षक श्री मुलमूले सामाजिक वनीकरण सिंदेवाही हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]