आयटीआय शिबिरार्थ्यांनी वढा वासियांची मने जिंकली : निःशुल्क मेंटेनन्स वर्क, संगम नदीपात्र प्लास्टिक कचरा संकलनआयटीआय शिबिरार्थ्यांनी वढा वासियांची मने जिंकली : निःशुल्क मेंटेनन्स वर्क, संगम नदीपात्र प्लास्टिक कचरा संकलन 

 
चंद्रपूर (प्रतिनिधी )-
             शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार  शिबिर श्रीक्षेत्र वढा येथे  सुरू असून या शिबिरातील स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने गावातील विविध मेंटेनन्स ची कामे निःशुल्क करून   वढा वासियांची मने जिंकली. कुलर दुरुस्ती , एसी दुरुस्ती , वॉटर फिल्टर पंप , फ्रीज, टेबल पंखे यासारख्या विजेची उपकरणे तसेच वेल्डिंगची कामे करून दिलीत. पेंटर ट्रेड च्या प्रशिक्षणार्थ्यांनी जि.प. प्राथमिक शाळेच्या  भिंतीवर  शालेय शिक्षणाच्या संबंधित  चित्रे  पेंटिंग काढून दिलीत. तसेच गवंडी विभागाच्या प्रशिक्षणार्थांनी सिव्हिल वर्क मेंटेनन्स करून दिले. मुख्य कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार, शिल्प निदेशक मडावी,कांबळे, भोंगळे, रणदिवे, लांडगे , टेंभुर्णे, दुपारे, केने ,गराड , इरदंडे आदी निदेशकांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले.  
     वढा येथे असलेल्या त्रिवेणी नद्यांच्या संगमावर प्लास्टिक कचरा जमा झाला होता. तो प्लास्टिक कचरा संकलन करून विल्हेवाट लावण्यात आली. 
  रोज सकाळी वढा गावातून शिस्तबद्ध ग्राम जागृती प्रभातफेरी काढण्यात आली.  यात परिसर  स्वच्छता, वृक्षारोपण, कौशल्य विकास, व्यसनमुक्ती , व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व, पाणी बचत, याविषयावरील  घोषवाक्यांनी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. 
    सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रा. अशोक चरडे (चिमूर ) यांचे राष्ट्रीय कीर्तन, बंडोपंत बोढेकर यांचे ग्रामगीतेवरील व्याख्यान, सायबर सेल विभागाचे अधिकारी रोशन इरपाचे व मुजावर अली यांचे सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन, माजी सैनिक मनोज ठेंगणे यांचे सैनिक असतांनाचे स्वानुभव, मारोती साव यांचे आत्मकथन या सारख्या कार्यक्रमाने तर शिबिरार्थांच्या ज्ञानात विशेष भर पडली. 
      शिबिराचे उत्तम आयोजन केल्याबद्दल  सरपंच किशोर वरारकर , जि.प. मुख्याध्यापक सुदर्शन नैताम यांनी  संस्थेचे कौतुक केले आहे. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने यापुढेही  ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेस योग्य ते सहकार्य मिळत राहील, असे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर म्हणाले.
    
      महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे वतीने जिल्हा संघटक संदीप कटकुरवार यांनी शिबिर स्थळी व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती करणारी पोस्टर प्रदर्शनी लावली . गावातील ज्येष्ठ नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन दुर्व्यसनांमुळे होणारे आजार याबाबत माहिती समजून घेतली.  कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने  कृषी व्यवसाय व व्यवस्थापन तंत्रज्ञान विषयावरील माहितीपर पोस्टर शेतकरी बांधवांना वितरीत करण्यात आले. 
   साहिल बुलबुले, पियुष ढाक आणि संच यांनी विनोदी शैलीत जनप्रबोधनपर पंचरंगी कार्यक्रम प्रस्तुत केला. त्यात त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान विषयावर प्रबोधन केले.  तसेच सहभागी  स्वयंसेवकांनी  येथून जवळच असलेल्या सुप्रसिद्ध हेमाडपंथी जुगाद  मंदिरास  भेट देऊन तेथील प्राचीन शिल्पकलेचे अवलोकन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]