अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल युवकास अटक.तळोधी (बा.):
     पोलीस स्टेशन तळोधी अंतर्गत आज एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाच्या आमिष दाखवून लॉज वर नेवून बलात्कार केल्याने युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून युवकाला अटक करण्यात आली. 
 सविस्तर वृत्त आज दि.23/02/2024 रोजी एक  अल्पवयीन पीडित मुलीने ( वय 15 वर्षे ) तळोधी बा. पोलीस स्टेशन येथे येवुन दिलेल्या तक्रारीनुसार तिची सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर एक शुभम मोहुर्ले नामक,वय 30 वर्षे, रा. ओवाळा येथील तरुणाशी ओळख झाली . त्यातुन त्यांची मैत्री होवुन त्याने  तिला लग्नाचे आमिष देऊन काल रोजी  सिंदेवाही येथील एका लॉजवर नेऊन तिचे इच्छेविरुद्ध तिच्याशी अती प्रसंग केलेला आहे. अशा पीडितेच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तळोधी येथे कलम  363,366A,376,376(2)(n),376(3),506 भादवी सहकलम 4,6 पोक्सो अंतर्गत गुन्हा करण्यात आलेला असुन आरोपीस ताब्यात घेवुन अटकेची कार्यवाही सुरू आहे.
          गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अजितसिंग देवरे करिता आहेत.
     महत्त्वाचे म्हणजे बाहेर शिकायला जानार्या मुलींकडे त्यांच्या आई-वडिलांनी लक्ष देणे व त्यांचे मोबाईल तपासून पाहणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यातून असे प्रकार व अप्रीय घटना टाळता येऊ शकतात. व यातून अल्पवयीन  मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवता येईल.     
        सोबतच पैशाच्या अमिषापोटी सिंदेवाही येथील लॉज मालीक किंवा अशा कुठल्याही परिसरातील लाजवर अल्पवयीन मुलींना मुलांसोबत प्रवेश देणे हे लॉज मालकांनी टाळणे गरजेचे आहे. जर असे होत असेल तर संबंधित प्रत्येक लॉज मालकांवर सुद्धा गुन्हा दाखल होणे तेवढेच गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]