पवनी शहरांमध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक २५/०२/२०२४ रोजी संत रोहिदास वार्ड पवनी,  येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ पवनी शाखेतर्फे, संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्त रांगोळी स्पर्धा वकृत्व स्पर्धा लहान मुलांच्या डान्स स्पर्धा तसेच पवनी शहरांमध्ये संत रविदास महाराजांच्या उत्सवानिमित्त रॅलीचे सुद्धा आयोजन केलेले होते. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य लीलाधर कानोडे, सौ. मीनाताई भागवतकर, सुरेश अवसरे, जिल्हा अध्यक्ष आर. सी. एम. पवनी  , नरेंद्र पहाडे, सामाजिक कार्यकर्ता एड.राहुल बावणे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर योगेश रामटेके, कमलेश जिभकाटे हेमराजजी कानझोडे, मिथुन घुबडे, शिशुपालजी शिंगाडे इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.व महामंडळाच्या कल्पना भंगाळे, जिल्हा व्यवस्थापक, या सह उदघाटीका म्हणून उपस्थित होत्या.यावेळी मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.सदर कार्यक्रमामध्ये लिडकॉम आपल्या दारी अंतर्गत योजनांचे प्रचार व प्रसिद्धी साठी स्टॉल लावण्यात आला होता. मंचकाहून कल्पना भंगाळे यांनी महामंडळाच्या नवीन योजनांची माहिती व सुवर्ण वर्षानिमित देण्यात येणारी व्याजदर सुट, एम.सी. इ. डी प्रशिक्षण याचा समाजातील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. माहिती पत्रके , फॉर्म व दिनदर्शिका वाटप हे काम  सुधीर क्षीरसागर वालदे मॅडम ,साहिल बोटूले यांनी व्यवस्थित रित्या पार पाडले. सोबत एम.सी.इ.डी चाही स्टॉल लावण्यात येऊन प्रकल्प अधिकारी चौरे यांनी मंचकाहून एम सी ई डी च्या ट्रेनिंग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जयंती उत्सव यशस्वी पार पाडण्या साठी शहराध्यक्ष शेषराज अवसरे,शैलेश वाकडीकर, सुरज अवसरे होमदेव वाकडीकर शरद लोखंडे एड. विद्यानंद बनारसे धनराज सिंहगडे अंकुश वाकडीकर संघर्ष अवसरे गणराज वाकडीकर प्रशांत लोखंडे दिपक बनारसे अजय वाकडीकर श्रीहरी अवसरे पवन वाकडीकर गणेश वाकडीकर प्रकाश अवसरे कार्तिक वाकडीकर मोरेश्वर वाकडीकर डेव्हिड वाकडीकर हिमांशू वाकडीकर मोहित वाकडीकर अभिलाष अवसरे तसेच महिला शहर अध्यक्ष शालू अवसरे रूपाली सिंहगडे रोशनी लोखंडे अर्चना वाकडीकर महानंदा वाकडीकर सुषमा वाकडीकर नीलिमा अवसरे सोनू वाकडीकर करिष्मा वाढई आशिका वाकडीकर उर्मिला अवसरे कल्याणी वाकडीकर आशिका लोखंडे चित्रा लोखंडे आशा अवसरे सत्यभामा वाकडीकर प्रतिभा वाकडीकर उमाताई बावणे आचल बनारसे शितल वाकडीकर करिष्मा अवसरे माधुरी वाकडीकर तसेच फार मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन धनराज सिंहगडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]