आदिवासी मुला मुलींचे शासकीय वसतीगृह, चिमुर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - आदिवासी मुलांचे व आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, चिमुर यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलन तथा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम सत्र हे दिनांक. ०३ फेब्रुवारी २०२४ शनिवार ला सकाळी १०.३० ते ०३ वा. क्रिडा स्पर्धा घेण्यात आली. सायं. ०५ वा. सामान्य ज्ञान परिक्षा घेण्यात आली. तसेच द्वितीय सत्रामध्ये दिनांक.०४ फेब्रुवारी २०२४ रविवार ला दुपारी १२ वा.सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मुलांमध्ये प्रथम क्रमांक निखिल गोपीचंद झाडे बी. ए. प्रथम सत्र , तर द्वितीय क्रमांक संचित संतोष दडमल बी.कॉम.प्रथम सत्र , तृतीय क्रमांक रुतीक दिलीप मडावी बी.कॉम.फायनल व मुलींमध्ये प्रथम क्रमांक कु.प्राजक्ता मारोती गेडाम , द्वितीय क्रमांक कु.करुणा शंकर दडमल , तर तृतीय क्रमांक स्वाती विठोबा कन्नाके यांनी पटकाविले. या कार्यक्रमाला उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रमुख प्रविण लाटकर प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, चिमुर व उद्घाटक म्हणून लाभलेले एम. व्हि. डुले सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, चिमुर , प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. दिवाकर कुमरे आठवले समाजकल्यान महाविद्यालय, चिमुर , प्रमुख अतिथी डॉ. अश्विन अगडे वैद्यकीय अधिकारी, चिमुर , विनित दुर्गेश दरबेशवार गृहपाल , श्रीमती. ज्योती झाडे गृहपाल  (प्रभारी) , तथा यर्व कर्मचारी वृंद, तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यावेळी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]