एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरु करा - आगार व्यवस्थापकाकडे विद्यार्थ्यासह मागणी

एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरु करा - आगार व्यवस्थापकाकडे विद्यार्थ्यासह मागणी

        सावली - गडचिरोली.. व्याहाड... सामदा... सोनापूर ही 25 वर्षांपासून सुरु असलेली बस सेवा बंद झाल्याने अनेकांना प्रवासासाठी अडचणी येत असल्याने पूर्ववत ही सेवा सुरु करण्याची मागणी जागरूक नागरिक व विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकाकडे केली.
      गडचिरोली, व्याहाड बुज., सामदा, सोनापूर ही बस सेवा मागील 25 वर्षांपासून सुरु होती परंतु कोरोना काळापासून ही बस सेवा बंद करण्यात आली यामुळे या मार्गातील विद्यार्थी, रुग्ण, व इतर प्रवाशांना प्रवास करण्यास फारच अडचणी येत आहेत. त्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी मा. आगार व्यवस्थापक फाल्गुण राखडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते अविनाश भुरसे, बंडुजी सोमणकर, स्वप्नील भुरसे व बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते आगार व्यवस्थापक यांच्या सोबत सकारात्मक चर्चा घडून आली व पुढील शैक्षणिक सत्रापासून बस सुरु करण्यात येईल अशी ग्वाही मा. आगार व्यवस्थापक यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]