व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी नंदकिशोर भरडकर तर सचीव पदी सुनील गुरूनूले यांची निवड

तळोधी बा.----- अप्पर  तहसील तळोधी बा. येथील व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष पदी नंदकिशोर भरडकर तर सचिव पदी सुनिल गुरुनूले व उपाध्यक्ष पदी सुभाष पाकमोडे, व कोषाध्यक्ष पदी संतोष पोशट्टीवार यांची निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या साई मंदिर येथील बैठकीत यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.वर्षभरात असोसिएशनकडुन कोणकोणते उपक्रम राबविण्यात येणार याची माहिती देण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्येने व्यापारी उपस्थित होते. बैठकीनंतर स्नेहभोजन करून उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]