पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष महेश पानसे यांचा तळोधी बा.पत्रकार संघातर्फे सत्कार.तळोधी बा:  
      महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष मा.महेशजी पानसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुल येथील , आकापूर जवळील स्टार हाँटेलमध्ये महाराष्ट्र पत्रकार संघ तळोधी बा.चे अध्यक्ष व लोकमत चे शहर प्रतिनिधी संजय अगडे, सहसचिव व देशोन्नती वार्ताहर भारत चुनारकर, दै.सकाळचे प्रतिनिधी राहुल रामटेके व पब्लिक पंचनामा चे तालुका प्रतिनिधी, वन समाचार चे जिल्हा प्रतिनिधी व स्वाब संस्था चे अध्यक्ष यशवंत कायरकर यांच्या वतीने प्रा.महेश पानसे सर यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
  यावेळी मा.तहसिलदार मा.डा.रविंद्र होळी,मा.प्रशांत वसुले उपविभागीय अभियंता सा.बा.उपविभाग,मुल, मुलचे ठाणेदार मा.सुमित परतेकी, प्राचार्य अशोक झाडे, नवभारत विद्यालय मुल,मा.बाळूभाऊ भोयर जेष्ठ पत्रकार, वरोरा यांच्या उपस्थितीत हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री महेश पानसे यांचा अभिष्टचिंतन व सत्कार समारंभ पत्रकार संघ मुल च्या वतीने आयोजित करण्यात आला.  
   यानंतर संपूर्ण तालुका व शाखाध्यक्षांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळेस तळोधी शाखेचे अध्यक्ष संजय अगडे यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बंधू उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]