मुख्यमंत्री सक्षम नगर परिषद स्पर्धेत मूल नगर परिषदेला तिसरा क्रमांकमुख्यमंत्री सक्षम नगर परिषद स्पर्धेत वर्ग प्रवर्गातून नागपूर विभागात मूल नगरपरिषदेने तिसरा क्रमांक पटकाविल्याने नगरपरिषद अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मुल नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार यशवंत पवार यांनी याबाबतची माहिती दिली.
या स्पर्धेत मूल नगर परिषद तिसरी आल्याने एक कोटी रुपयाचे बक्षीस नगरपरिषदेला मिळणार आहे.
विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी याबाबत मुख्याधिकारी यशवंत पवार यांना याबाबत कार्यालयीन पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी
सर्वांना सप्रेम नमस्कार,आपणा सर्वांना कळविण्यात आनंद होतो की मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023* यामध्ये मूल नगर परिषदेला क वर्ग नगर परिषद गटातून *नागपूर विभागातून तृतीय क्रमांक* प्राप्त झाला आहे. यामुळे मूल नगर परिषदेला शासनाकडून एक कोटी रुपये रकमेचा बक्षीस निधी मिळणार आहे. सदर निधीचा उपयोग नगरपरिषद मूलवासियांचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठी करेल हे नक्की.सदर पुरस्कार हा आपल्या सहकार्य आणि मार्गदर्शनाशिवाय प्राप्त झाला नसता, यामुळे आपल्या सर्वांचे तसेच मूल शहरातील नागरिकांचे मी नगरपरिषद मुख्याधिकारी या नात्याने ऋण व्यक्त करतो आणि पुढेही आपली अशीच अपेक्षा राहील अशी आशा करतो. धन्यवाद. आपलाच, यशवंत पवार,🙏🙏

या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
मुख्याधिकारी यशवंत पवार व त्यांचे सर्व सहकारी यांचे अभिनंदन.
यापूर्वीही स्वच्छतेच्या स्पर्धेत मूल नगर परिषदेला केंद्र स्तरावरचे अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत हे उल्लेखनीय!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]