भाजपच्या नगर सेवकानी काँग्रेस च्या नगर सेवकास मारली जबर धडक

इनोव्हा कारची दुचाकी ला टक्कर

चिमूर येथील घटना

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.०४/०२/२०२४ ला काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास विनोद ढाकुनकर यांनी उपस्थिती दर्शवून दुपारी ०३:००  वाजताच्या सुमारास ग्रामगीता कॉलेज येथे प्रवेश गेटचे बांधकाम बघण्यासाठी गेले असता परत येतांना कॉलेज च्या अगदी समोरील चिमूर उमरेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर TVS कंपनीची जुपिटर दुचाकी क्रमांक.MH 34 BD 3128 तसेच टोयोटा कंपनीची इनोव्हा कार ने दुचाकीला मागून जबर धडक मारल्याने दुचाकी वाहन चालक गंभीर जखमी झाले तसेच तात्काळ चिमूर येथील डॉ.दिलीप शिवरकर यांच्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ प्रथमदर्शी उपचार सुरू केले व डोक्याला जबर मार असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.तसेच इनोव्हा कार वाहन चालक गोलू उर्फ सतीश जाधव हे माजी नगरसेवक तथा सभापती आहे.व भाजप चे आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडीया यांचे अत्यंत विश्वासू तसेच भाजप चे कार्यकर्ते आहेत. तसेच दुचाकी चालक विनोद ढाकुनकर हे सतीश वारजूकर यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक आहे.या घटनेमुळे भाजप तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा रंगली असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]