तळोधी बा. पोलीस स्टेशन द्वारे हरविलेले मोबाईल नागरिकांना परत केले.


( एकूण 1,25,000/- रु किमतीचे 8 मोबाईल शोधुन केले मोबाईल धारकांच्या स्वाधीन.)
यश कायरकर,:
          तळोधी पोलीस ठाणे  हद्दीत  मोबाईल हरविल्याबाबत, गहाळ झालेबाबत मागील काही दिवसांत तक्रारी प्राप्त झालेल्या होत्यात. सदर मोबाईलांचा शोध घेण्याबाबत मा. पोलीस  अधिक्षक सा. यांनी दिलेल्या सुचनांनुसार  सायबर सेल , चंद्रपुर   व तळोधी पोस्टे यांनी तांत्रिक माहिती घेवुन 1,25,000/- रु किमतीचे 8 मोबाईल शोधुन काढलेले आहेत. सदर मोबाईल हॅन्डसेट आज रोजी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर ठाेसरे साहेब यांचे उपस्थितीत मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत.  आपला हरविलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने मोबाईल धारकांनी आंनद व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानलेले आहेत. 
"आपला मोबाईल हरविल्यास , गहाळ झाल्यास किंवा चोरी गेल्यास त्याबाबत कागदपत्रांसह पोलीस ठाण्यास  माहीती द्यावी. तसेच कुणाचा मोबाईल सापडल्य़ास तो मुळ मालकास  परत करावा . मालक माहीती नसल्यास तो नजीकच्या पोलीस ठाण्यास परत करवा. सदर मोबाईल परत न करता त्याचा स्वतासाठी वापर केल्यास भादवि  कलम 403 प्रमाणे  गुन्हा ठरुन 02 वर्षे कावासाची शिक्षा होवु शकते."
 - अजित सिंग देवरे थानेदार तळोधी पोलीस स्टेशन, यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]