शिक्षक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : किशोर आनंदवार


जिल्हा परिषदेसमोर पुरोगामी शिक्षक संघटनेचे साखळी उपोषण

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेची सहविचार सभा जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे पार पडली . त्या प्रसंगी शिक्षक आणि शिक्षण यासाठी अग्रेसर असलेली आपली पुरोगामी संघटना प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून , त्यासाठी साखळी उपोषण करण्याचे सूतोवाच जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार यांनी केले . 
                   यावेळीराज्यनेते विजय भोगेकर, महिला मंच राज्याध्यक्षा डॉ.अल्का ठाकरे, राज्यसरचिटणीस हरीश ससनकर, जिल्हानेते दिपक व-हेकर, जिल्हासरचिटणीस सुरेश गिलोरकर, जिल्हाकोषाध्यक्ष सुनिल कोहपरे,महिला सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे, कार्याध्यक्ष सिंधू गोवर्धन,सल्लागार वासुदेव गौरकार , बाबू आईतवार व पुरोगामीचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करून ठराव घेण्यात आले . सोबतच नवनिर्वाचित पतसंस्था संचालकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले . 
            प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व ढिसाळ कारभारामुळे शिक्षकांच्या समस्या प्रलंबित असल्याने शिक्षकांत असंतोष पसरला आहे . परिणामी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नाईलाजास्तव महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने  जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचे निश्चित केलेले आहे.  समस्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले असून समस्यांचे निवारण न झाल्याने१२ फेब्रुवारी २०२४ पासून जिल्हा परिषद समोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]