प्रशासन सुस्त आणि रस्ता फस्त"             
       जानाळा ते फुलझरी रस्त्याची दुर्दशा!                 
             
 
मुल तालुक्यातील ताडोबा क्षेत्रात बसलेले फुलझरी येथे जाणारा जानाळा ते फुलझरी हा 5 किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झालेला असून, ग्रामस्थांकडून वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा अजूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झालेले आहे. जंगलातील रस्ता त्यात वन्य प्राण्यांची भीती असल्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खडतड रस्ता, उघडलेली गिट्टी व उतरण असल्यामुळे मागील वर्षी फुलझरी ग्रामस्थांनी स्वतः लोकवर्गणी व श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली होती. तरी प्रशासन व वन विभागाकडून परवानगी देत रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी वारंवार निवेदन व सतत पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे वेळ आल्यास रास्ता रोको  आंदोलनाचा इशारा ग्रामसभा फुलझरी कडून करण्यात आला आहे. तरी स्वतः पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]