घरकुलासाठी लाभार्थ्यांचा पंचायत समितीसमोर ठिय्या - बिडिओ सोबत चर्चा होऊनही आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार

घरकुलासाठी लाभार्थ्यांचा पंचायत समितीसमोर ठिय्या - बिडिओ सोबत चर्चा होऊनही आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार
सावली: पात्र असूनही घरकुलापासून वंचित ठेवले असा आरोप करीत घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी जीबगाव येथील लाभार्थ्यांनी पंचायत समितीसमोर २२ फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या बिडिओ मधुकर वासनिक यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र घरकुल मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.
    तालुक्यात मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. जीबगाव येथील दिलीप अशोक पाल व विलास उरकुड़ा नागापुरे यांना मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला नाही. अग्रक्रमाने लाभ न देता वा कोणतीही घरकुलांची चौकशी न करता ग्रामपंचायत जीबगाव येथील सरपंच व सचिव यांनी संगनमताने आम्ही पात्र असताना डावलले असून अपात्र लाभार्थ्यांना पात्र दाखविण्यात आल्याचा आरोप करीत सावली पंचायत समितीसमोर कुटुंबासह आंदोलन सुरु आहे. आंदोलन स्थळी गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, माजी सभापती विजय कोरेवार, विस्तार अधिकारी राजू परसावार, विस्तार अधिकारी संजीव देवततळे यांनी आंदोलकांशी चर्चा करीत समजविण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.
---------
जीबगाव येथील २० लाभार्थ्यांना मोदी आवास घरकुल मंजूर करण्यात आले आहे. आंदोलनकर्ते यादीत पात्र असून लक्षांक मिळाल्यावर प्राधान्याने लाभ देता येणार आहे. 
- मधुकर वासनिक
 गटविकास अधिकारी पं.स. सावली
-------
घरकुलाचा लाभ शासकीय परिपत्रकाप्रमाणे व ग्रामसभेच्या निवडीनुसार देण्यात आलेला आहे. आंदोलकांचेही नावे पात्र यादीत आहे.  लाभार्थी जास्त टार्गेट कमी असल्याने त्यांचा गैरसमज झालेला आहे.
- पुरषोत्तम चुधरी
सरपंच ग्रा.पं. जिबगाव
--------
अपात्र व्यक्तींना घरकुल मंजूर करून  गरजूना डावलण्यात आले आहे. सरपंच व पंचायत समितीचे अधिकारी यांनी गैरप्रकार केलेला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी.
- राकेश गोलेपल्लीवार
सदस्य ग्रा. पं.  जिबगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]