महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांचे हालच - हाल शासनाचे दुर्लक्ष

लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी तालुका हा विदर्भाची काशी म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे पवनी हि नगरी भंडारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. या नगरीमध्ये सर्वसाधारण व्यक्ती कास्तकार कामगार मोठ्या प्रमाणावर असून त्यामध्ये संपूर्ण मजूर कामगार वर्ग आहे. परंतु रोजगार नसल्यामुळे कामगार मजूर यांना आज गृहपयोगी पेटी वाटप कार्यक्रम करण्यात येत आहे. त्यामध्ये पवनी येथील कामगार  शेतकरी व इतर मागासवर्गीय लोकांना भारत सरकार द्वारे पेटी वाटपाचे कार्यक्रम चालू असून त्यामध्ये पवनी तालुक्यामध्ये जवळपास ७८ गावे येतात त्यामध्ये पुन्हा लाखांदूर तालुका यांच्या सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. असे मिळून जवळपास दोन तालुके यांचा पेटी वाटप करण्याचा कार्यक्रम पवनी येथील संताजी मंगल कार्यालय बेलघाटा वार्ड इथं होत आहे परंतु याकडे पवनी तहसीलदार तसेच पवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असून गोरगरीब जनतेला पवनी नगरीमध्ये नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आणि एक - एक रात्र त्या ठिकाणी बाहेरून येणारे गोरगरीब कामगार नागरिक मुक्कामी राहून आम्हाला पेटी मिळेल या अपेक्षित उपस्थित राहतात यास सर्वस्वी जबाबदार भंडारा जिल्हा कलेक्टर व शासन प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे समोरील कोणतीही आपत्ती घडल्यास सर्वस्वी जबाबदार हे शासनच प्रशासनच राहील अशी चर्चा जनसामान्यांमध्ये होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]