मोबाईल वरील मेसेज ओपन करतास खात्यातून पन्नास हजार लंपास तळोधी पोलिसांच्या दक्षतेने गेलेले पैसे परत मिळाले.
यश कायरकर:
                 तळोधी बा. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथील  शिक्षक भारत महादेवसव झाडे वय. 56 वर्षे यांना त्यांच्या मोबाईलवर  02/02/24 ला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून SBI REWARDS संदर्भात एक संदेश प्राप्त झाला. त्यातील लिंकवर त्यांनी क्लिक  करुन विचारलेली माहीती भरली असता त्यांच्या खात्यातील 50,000 रु रक्कम कमी झाल्याचा संदेश त्याना प्राप्त झाला. आपली सायबर अपराधीकडुन फसवणुक झाल्याचे त्यांचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ तळोधी पोलीस ठाण्यात येवुन उपस्थित स्टाफ व ठाणेदार स.पो.नि. अजितिसंग देवरे यांना झालेल्या प्रकाराबाबत माहीती दिली. 
    सदर 50,000/- रु रक्कमेचा ट्रान्झेक्शन तात्काळ थांबवुन सदर रक्कम मुळ खात्यात वळती करणेबाबत सदर बँकेच्या नोडल अधिकारी यांना तळोधी पोलीसांनी मेल करून माहीती दिल्याने दि. 04.02.2024 रोजी भारत झाडे यांना त्यांवे 50,000/- रु परत मिळालेले आहेत. त्याबद्दल त्यांनी तळोधी पोलीसांचे आभार मानलेले आहेत. 
        सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ठोसरे यांचे मार्गदर्शनात तळोधी पो.स्टे.कडुन करण्यात आलेली आहे. तळोधी पोलीस ठाणेदार यांचे कडून नागरिकांना आवाहन केले की, "आपल्या मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या अनोळखी संदेशाना प्रतीसाद देवु नये. तसेच बक्षीस, लॉटरी किंवा आर्थिक फायदा सांगुन पाठविण्यात येणाऱ्या लिंक्सवरील संकेत स्थळांवर जावुन नये. जर आपली आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास व बँकेस योग्य माहीती पुरविलयाने आपली फसवणुक झालेली रक्कम परत मिळु शकते." असे आवाहन तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजितसिंग देवरे यांनी परिसरातील जनतेला केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]