भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिराचे आयोजन - सावली तहसील प्रशासनाचा पुढाकार

भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिराचे आयोजन - सावली तहसील प्रशासनाचा पुढाकार
सावली - विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाना विविध दाखले मिळावे या उद्देशाने शासनाच्या आदेशानुसार सावली तहसील प्रशासनाने १ मार्च ते  ५ मार्च दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजता तालुक्यातील ५ ठिकाणी शिबिराचे आयोजन केले आहे.
         भटक्या जाती व जमाती (NTA व NTB) जमातीतील लाभार्थ्यांना आधार कार्ड, राशन कार्ड, इलेक्शन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, निराधार योजना, जात प्रमाणपत्र लवकर मिळावे याकरिता सावली तहसील प्रशासनाने विशेष शिबिराचे आयोजन केलेले आहे.
 १ मार्च रोजी ग्रामपंचायत व्याहाड खुर्द येथे वाघोली, व्याहाड बुज, सामदा बुज, सोनापूर, व्याहाड खुर्द, किसाननगर, कोन्डेखल, केरोडा, जामबुज, जाम केरोडा रै., मोखाळा, चिचबोडी येथील नागरिकांनी सहभागी व्हावे. 
 २ मार्च रोजी  ग्रामपंचायत हरांबा येथे हरांबा, उमरी, कढोली, लॉढोली, साखरी माल, कापसी, उपरी, डोनाळा माल, नि. पेठगाव, भान्सी, जिबगाव, पेटगाव माल, सौर्सी माल येथील नागरिकांनी सहभागी व्हावे.
३ मार्च रोजी ग्रामपंचायत पाथरी येथे पाथरी, करगाव चक, सायखेडा, मेहा खुर्द, पालेबारसा, मंगरमेंढा, जनकापूर रिठ, उसरपार चक, मेहा बुज, गेवरा बुज, गेवरा खुर्द, करोली, आकापूर, पेंढरी मक्ता, मुंडाळा, सायमारा तुकूम.
४ मार्च रोजी अंतरगाव ग्रामपंचायत येथे अंतरगाव, अंतरगाव टोला, गायडोंगरी, चक विरखल टोला, विरखल चक, नवेगाव तुकूम, राजोली फाल, निफंद्रा, चिखली, डोंगरगाव मस्के, मोवाळ चक, निमगाव, बेलगाव, थेरगाव, दाबगाव, विहीरगाव, बोरमाळा, कसरगाव.
५ मार्च रोजी ग्रामपंचायत चकपिरंजी येथे सावली, चकपिरंजी, कवठी, पारडी, सिंगापूर, रुद्रापूर, खेडी, चांदली बुज, चारगाव, उसेगाव, घोडेवाही, सिंदोळा, भटटी जाब, बोथली, हिरापूर, केशरवाही, पिरंजीमाल.
        सदर शिबिरात विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी केले आहे.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]