मोटेगाव येथील सार्वजनिक बोरवेलच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने माजली खळबळ

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - मोटेगाव येथील हनुमान वार्ड क्र.१ श्री. दुर्गादास पाटील सुकारे, यांच्या घराजवळील  सार्वजनिक बोरवेलच्या पाण्यात नारूसदृश जीवजंतू आढळून आल्याने आज शनिवारी सकाळी खळबळ उडाली. ग्राम पंचायत मोठेगाव अंतर्गत येणाऱ्या गावातील बऱ्याचशा बोरवेलच्या पाण्यात नारू सदृश जीवजंतू आढळणे, ही बाब नागरिकांच्या आरोग्यास धोक्यात आणणारी आहे.हनुमान वार्ड क्र.१ मध्ये सुमारे शंभर ते दिडशे घरांची वस्ती असून तेथे बरेचसे लोकांचे वास्तव्य आहे. शनिवारी सकाळी श्री. दुर्गादास पाटील सुकारे यांच्या घराजवळील बोरवेलच्या पाण्यात मोठ्या आकाराचा जीवजंतू दिसताच उपस्थित नागरिक भयभीत झाले. व पाच ते सहा महिन्यांपूर्वी जवळच्याच वसाहतीत बोरवेलच्या पाण्यातून नारूसदृष्य जीव निघाला होता. त्यामुळे पुन्हा नारुसदृश जीव दिसताच मोटेगाव च्या नागरिकांनी त्यास बॉटलीत कैद केले.बोरवेलच्या पाण्यातून अनेकदा दूषित पाणी पुरवठा होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली. याासंदर्भात ग्राम पंचायत मोटेगाव याठिकाणी तक्रारी नोंदविल्या.मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ही बाब गंभीर असून, याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा नागरिकांनी वर्तविली आहे. गावातील बोरवेल मध्ये दूषित पाण्यात नारू आढळून येतो, नारुसदृश जीवजंतू पाण्याद्वारे पोटात गेल्यास उलटी, अतिसार, काविळ, पोटदुखीसारखे आजार बळावतात. म्हणून पाणी स्वच्छतेकडे शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]