धान्य चोरट्याला पकडले: जनकापूर येथील घटना;
तळोधी (बा.) नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत येतं असलेल्या जनकापूर येथील अरविंद चंदनखेडे यांचे घरून धान्यांचे पोते चोरी झाल्याची घटना सकाळी उजेडात आली असता. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असतां गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. 
      चोरट्यांनी चोरलेले धान्यांचे पोते चोरून नेले तेव्हा धान्य पोत्यातून पडतं गेले व त्या धान्यावरून चोरट्यांचा शोध लागला. घटनेची माहिती नागभिड पोलिसांना देण्यांत आली. घटनेची चौकशी करून विशाल श्रिराम कुळमेथे रा. जनकापूर या चोरट्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या आधी जनकापूर गावात अशोक मेश्राम यांचे किरांना दुकान चोरट्यांनी फोडले होते. तर काही दिवसांपूर्वी काशिराम कन्नाके,  सुरज खोब्रागडे यांचे मालकीच्या मोटार पंप शेतातुन चोरल्याची घटना घटली होती. दरम्यान गेले महिन्याभरात चार ते पाच चोरीच्या घटना जनकापूर येथे घटल्याने नागरिकांत भिंतीचे वातावरण पसरले आहे. आज घटलेल्या घटनेमुळे प्रत्यक्ष चोरट्याला लगेच पकडण्यात यश आले असुन याआधी झालेल्या चोरीच्या घटनेशी सबंध आहे काय? यांची चौकशी नागभिड पोलिस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]