मूल शहरात होते चंद्रपूर जिल्हयांचे मुख्यालय!

मूल शहरात होते चंद्रपूर जिल्हयांचे मुख्यालय!

MUL


लोकपूर, इन्दुपूर, चंद्रपूर, चांदा असे नांव धारण करणाऱ्या चंद्रपूर या ऐतिहासिक जिल्हयांचे मुख्यालय आजचे मूल शहर होते.  चंद्रपूर जिल्हयाची निर्मीती झाल्यानंतर, या जिल्हयांचा कारभार मूल तालुक्यातून चालायचा, हे कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही, मात्र हे ऐतिहासिक सत्य आहे! #Mul #Chandrapur

मूल तालुका हा ऐतिहासिक काळापसूनच राजकीय आणि सामाजीक क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवून आहे.  याच क्षेत्रातून मुख्यमंत्री, वजनदार मंत्री राज्याला मिळाले.  ऐवढेच नव्हे तर, देशातील स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भुमिका वटविणारी खादी ग्रामोद्योगाचे अखिल भारतीय कार्यालय मूल येथेच होते. देशभरातील खादी ग्रामोद्योगाचे मुख्यालय त्यावेळी मूल शहरात असल्यांने साहजीकच देशभरात मूल हे प्रसिध्द होते.  पुढे जावून हेच अखिल भारतीय खादी ग्रामोद्यागाचे विकेद्रिंकरण होत सुरूवातील मद्रास खादी उद्योग व पुढे विविध राज्यांनी स्वत:चे खादी ग्रामोद्योग सुरू केले आणि मुळातील अखिल भारतीय खादी ग्रामोद्योगाचे नाग विदर्भ चरखा संघ अस्तित्वात आले.

चंद्रपूरचे प्राचिन नाव लोकपूर होते, द्वापारयुगाचे अंती कुंतलपुरच्या चंद्रहास्य राजाने लोकपूरवर स्वारी करून, 'लोकपूर' पादाक्रांत केले. झरपट व इरई नदीच्या सुंदर व रमणीय प्रदेशाने त्याचे चित्त आकर्षित करून पुढे हीच आपली राजधानी केली. आपल्या नावांची चिरस्मृती म्हणून त्यांने लोकपूरचे प्राकृत नामांतरण चंद्रहास्याचे चंद्रपूर असे केले.  संस्कृत मध्ये यालाच इन्दुपूर असेही म्हटल्या जायचे.

चंद्रपूरवर इंग्रजी राजसत्ता स्थिर झाली. इ.स. 1864 मध्ये चंद्रपूर उर्फ चांदा जिल्हयावर कॅप्टन एच. एफ. बॅडिन्टनची डेप्यु​टी कमिश्नर म्हणून नेमणूक झाली. चंद्रपूर सुभ्याचे चंद्रपूर जिल्हयात रूपांतरण झाले. जे परगणे होते, त्या तहसिल झाल्यात. इंग्रजी उच्चारानुसार चंद्रपूरचे चांदा जिल्हा व चांदा शहर असे उल्लेख होवू लागले. चांदा जिल्हा असले तरी, त्यांचे मुख्यालय तहसिल मूल येथेच  होते. पुढे राज्य कारभाराच्या गैरसोईमुळे मुख्य कार्यालय चांदा येथे आणण्यात आले. त्यावेळी वरोडा, ब्रम्हपुरी, गडचिरोली व सिरोंचा असे तालुका होते, निजामशाही भारतात विलीन केल्यानंतर, राजुरा तालुक्याची यात भर पडली.

मूलच्या गांधी चौकातील सरकारी दवाखाना ज्या इमारतीत होता, तेथे पुर्वी पोलिस स्टेशन होते व आताचे पोलिस स्टेशन आहे, त्या इमारतीत पूर्वी तहसिल कार्यालय होते. इ.स. 1902 ते 1905 पर्यंत येथे सकोबा ब्राम्हण नावांचे तहसिलदार होते. सकोबा ब्राम्हण हे श्री. मामीडअया पंचकांत महाराजांचे एकनिष्ठ शिष्य होते.

स्वातंत्र्यानंतर झाले चांदा चे चंद्रपूर

'चांदा' म्हणून ओळखले जाणारे शहर 'चंद्रपूर' असे नामांकरण स्वातंत्र्यानंतर झाले. राज्यसरकारचे सामान्य प्रशासन विभागाचे प्रसिध्दीपत्रक क्रमांक एन. एस. सी. 1063—बी, दिनांक 11 जानेवारी 1964 नुसार 'चांदा' नगराचे 'चंद्रपूर' हे नामकरण करण्यात आले. (संदर्भ—चंद्रपूर नगरपालिका शताब्दीग्रंथ)

विजय सिध्दावार

9422910167

२ टिप्पण्या:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]