जंगलाच्या गावात सरनाला लाकडे नाही

जंगलाच्या गावात सरनाला लाकडे नाही


सरणावर जाताना एवढेच मला कळले होते!
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते!!
कवी श्रेष्ठ सुरेश भट यांनी जगण्या मरण्यावर मार्मिक शब्दात भाष्य केले असले तरी, मुल येथे वन विभागाच्या कृपेने जगण्यासोबत मरणानंतरही मृतकाच्या  वाटेला छळ येत आहे.
चारही बाजूने जंगलव्याप्त गावात सरनाला लाकडे नसल्याने मृत्यूनंतरही प्रेतास अंत्ययात्रेसाठी ताटकळत राहावे लागत आहे. दुर्दैव असले तरी वास्तव आहे.
मूल येथील सहकार विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी विलास बाटवे यांचे काल दुःखद निधन झाले.  मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची ही तयारी पूर्ण झाली. मात्र अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे मूल येथील वन विभागाकडे उपलब्ध नसल्याने, विलास बाटवे यांचे आप्तस्वकीय, मित्रमंडळी मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून सरणासाठी लाकडांची जमवाजमव करण्यात गुंतले होते.

माझे मित्र अंत्यसंस्कारासाठी सावली मधून लाकडे जमतील काय? याकरिता गेले असल्याने लाकड मिळाली तर अंत्यसंस्कार करता येईल अशी माहिती मृतक विलास बाटवे यांचे चिरंजीव गणेश बाटवे यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात 50 टक्के च्या वर भौगोलिक क्षेत्रात जंगल आहे. मुल तालुक्यातही किर्र जंगल आहे. जंगलात हजारोच्या संख्येत  सुकलेली पडलेली झाडे, लाकडे आहेत. मात्र मृत्यूनंतरही अंत्यसंस्कार केवळ लाकडे नाही म्हणून  थांबवून ठेवणे हे निश्चितच वेदनादायक आहे.
अंत्यसंस्काराकरिता वर्षाला साधारण किती लाकडे लागतील याचा अंदाज वन विभागाला निश्चितच आहे आणि त्याचे नियोजन करणेही शक्य आहे. मात्र मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी लाकड देण्यास वनविभाग  अपयशी ठरला आहे.
मूल शहरात करोडो रुपये खर्चून स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे, विद्युत दाहिनी किंवा डिझेल दाहिनी नसल्याने या स्मशानभूमीत लाकडावरच अंत्यसंस्कार करावे लागते. अशा परिस्थितीत लाकडे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वन प्रशासनाची असतानाही, लाकडे नाही म्हणून मृतकाच्या कुटुंबीयास, दुःखाच्या क्षणी धावा-धाव करावी लागत आहे.
जंगलाच्या जिल्ह्यात सरनालाही लाकडे नसल्याची परिस्थिती उद्भवल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आठ दिवसापूर्वीच सर्व लाकडे संपली आहेत. अधिक लाकूड जमा करण्यासाठी आमचे कडे जागेचा अभाव आहे. लाकडाचा साठा मागणी केलेला आहे. 
श्री. मस्के, वनपाल वन विभाग मुल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]