निकृष्ट दर्जेच्या कामामुळे आंबेनेरी येथील अंगवाडीचा स्लॅब पडला

वरिष्ठाकडून चौकसी करून ठेकेदार व अभियंतावर कार्यवाही होणार का..?

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा आंबेनेरी येथील अंगणवाडीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब पडला.अंगणवाडीचा बांधकाम ठेकेदार हर्षल डूकरे नावाचा व्यक्ती करीत आहे.अशी चर्चा आहे.या बांधकामामध्ये वापरण्यात येणारे  लोहा,गीट्टी,सिमेंट,रेती,विटा तसेच इत्यादी साहित्य हे निकृष्ठ दर्जेचे असूनही त्याचा वापर करण्यात आल्याने अंगणवाडी चा स्लॅब पडला असल्याची चर्चा होत आहे. आपला बोगस बांधकाम लपवण्यासाठी तात्काल दुरूस्ती चे काम ठेकेदार यांचेकडून केला जात आहे. ठेकेदार बांधकाम झाल्या नंतर १५ ते २० पाणी नमारता दोन ते तीन दिवसात रंग-रांगोटी करून बांधकाम पुर्ण झाल्याचे दाखवत असतात.यामुळे बोगस बांधकाम लपवीला जातो.
तालूक्यामध्ये अश्या प्रकारचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.वरीष्ठ अधिकारी यांचेकडून संपुर्ण तालुक्यात झालेलेल्या बांधकामाची चौकसी करण्यात यावी. व इस्टीमेंट नुसार कोणत्याही प्रकारचे बांधकाम होत नसल्याने सर्व बांधकामाची चौकसी करून चौकशीअंती दोशी ठेकेदार व अभियंता यांचेवर कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी जनते कडून केली जात आहे.सत्ताधारी पक्षाचे सरपंच व पदाधिकारी ठेकेदारी काम करीत आहे. लायसन्स धारक ठेकेदाराच्या लायसन्स चे वापर सत्ताधारी पक्षाचे सरपंच व पदाधिकारी ठेकेदार बनल्याने बांधकाम हे खालच्या दर्जेचे होत आहे. या शासकीय कामातील पन्नास टक्के रक्कम गाळ होत असल्याचीही चर्चा आहे.अश्या ठेकेदाराचे वरिष्ठ अधिकाऱ्यानी चौकसी करून लायसन्स रद्द करून काळ्या यादीमध्ये या ठेकेदाराचे नाव टाकण्यात यावे.अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]