शासकीय नियम झुगारून जिल्ह्यात गौण खनिजाची वाहतूक

वन व महसूल तसेच पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या वाळू , मुरूम , माती , गिट्टी ,  दगडी कोळसा याची वाहतूक सुरू आहे. नियमानुसार ट्रॅक्टर असो अथवा ट्रक त्यावर ताळपत्री किंवा ग्रीन नेट बांधून गौणखनीजाची वाहतूक करावी व असे न केल्यास दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.परंतु शासकीय नियमास सर्रासपणे झुगारून मुरूम असो अथवा वाळूची वाहतूक विना ताळपत्री झाकता वाहनास बिना नंबर प्लेट ने चालविले जात आहे.परंतु याकडे प्रादेशिक परिवहन अधिकारी ( RTO ) वाहतूक पोलीस यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.सर्व सामान्य व्यक्ती ट्रिपल सिट , विना हेल्मेट , विना लायसन्स , फॅन्सी नंबर प्लेट वाहन चालवताना आढळून आल्यास त्यावर चालन च्या स्वरूपात दंड वसूल करण्यात येतो.परंतु या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होतांना दिसत असल्याने पोलीस प्रशासनावर ? निर्माण झाला आहे. कारवाई न करणे यामध्ये पोलिस तसेच परिवहन अधिकारी यांची हातमिळवणी तर नाही ना असा ? जनतेसमोर उपस्थित झाला आहे. शासनाने गौण खनिजाची लीज काढली असेल तरीही त्यांनी त्या खनिजाची किती वाहतूक केली ती माहीती मिळविण्यासाठी एका HB गॅझेटची तसेच CCTV फुटेज ची सक्ती केली असून त्या वाहनाने किती फेऱ्या मारून वाहतुक केली हे स्पष्ट होते. परंतु शासनानी हे नियम कागदावरच रेखाटले असून हे सर्व बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही असे यावरून समजते चौकशी करायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला होतो तर कधी चारचाकी वाहनाने अपघात घडवून आणण्याचा सुद्धा या माफियांचा षडयंत्र असतो.याकडे जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही वाहतूक आढळून आल्यास तात्काळ  चालकावर व मालकावर कारवाई व्हायला हवी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]