मुंडाळा ग्रामपंचातमधील तीन सदस्य अपात्र - सरकारी जागेवर अतिक्रमण करणे भोवले


मुंडाळा ग्रामपंचातमधील तीन सदस्य अपात्र - सरकारी जागेवर अतिक्रमण करणे भोवले
सावली -  तालुक्यातील मुंडाळा ग्रामपंचायत मधील सदस्य दुमाजी डोमाजी गंडाटे , अविनाश खेमचंद पेंडलवार, संगीता रुपचंद नन्नावरे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे एका आदेशान्वये रद्द केले आहे.
      मुंडाळा येथे  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक लढवून सत्तेत आले. परंतु सदर उमेदवारांनी व कुटुंबियांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले होते. याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे मुंडाळा येथील माजी सरपंच दामोधर गोबाडे यांनी दुमाजी डोमाजी गंडाटे, अविनाश खेमचंद पेंडलवार, संगीता रुपचंद नन्नावरे हे ग्रामपंचायत सदस्य गावठाण जागेवर व महसूल जागेवर अतिक्रमन केले असल्याने सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. वादी- प्रतीवादी ची बाजू विचारात घेता वादीच्या तक्रारीत सत्य आढळल्याने अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (ज-४) नुसार तिन्ही सदस्यांच्या अपात्रतेचे आदेश दिले आहे. यामुळे तालुक्यातील अतिक्रमणधारक लोकप्रतिनिधिमध्ये खळबळ माजली आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]