न्यू राष्ट्रीय प्रेरणा कॉन्व्हेंट तथा राजीव गांधी प्राथमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम) चिमूर चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
 
चिमूर : - न्यू राष्ट्रीय प्रेरणा कॉन्व्हेंट   तथा राजीव गांधी प्राथमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम) चिमूर चे 
तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व स्पोर्ट्स डे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.अविनाश वारजूकर तर उदघाटक म्हणून माजी आमदार तथा अध्यक्ष आदिवासी सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. नामदेवराव उसेंडी हे होते. सह उदघाटक म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजूकर,तसेच विशेष अतिथी म्हणून चिमूर तालुका काँग्रेस ज्येष्ठ नेते धनराज मालके, अध्यक्ष चिमूर शहर काँग्रेस कमिटी  अविनाश अगडे, पालक प्रमुख अमित लोथे,पप्पू शेख,प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष प्रभू राजारामजी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था नागपूर सुष्मिता वारजूकर, कोषाध्यक्ष श्री प्रभू राजारामजी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था नागपूर पलाश वारजूकर,उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्या स्नेहसंमेलन प्रमुख  सौ. यामिनी खारकर मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अविनाश वारजूकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्नेहसंमेलनाचे महत्व विध्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासाबरोबरच कितपत महत्वाचे असते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ.नामदेवराव उसेंडी यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना अभ्यासाबरोबच खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुष्मिता वारजूकर आपल्या शाळेत नर्सरी ते 7 पर्यंत इंग्लिश मीडियम शाळा सध्या सुरू असून ही शाळा शैक्षणिक दृष्ट्या चिमुर मध्ये पुढे जात असून या शाळेचे उत्तम स्नेहसंमेलन व्हावे हा नेहमीच आपला प्रयत्न राहील या शाळेला आपण 12 पर्यंत पुढे नेणार आहोत नंतर पुढे चांगली उपयोगी कोर्स सुरू करण्याचा मानस आहे आपण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा  असे आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले कार्यक्रमा प्रसंगी सहउदघाटक डॉ. सतिश वारजुकर यांनी सुद्धा मंचावरून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यांच्या शुप्त गुंणांना वाव मिळण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या जिवनात प्रत्येक भागात उंच भरारी घेयाकरिता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. स्पोर्ट डे च्या माध्यमातून विविध खेळाचे तसेच स्नेहसंमेलणाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम गोंडी नृत्य, देशभक्ती पार नृत्य, अनेक राज्यावर वर आधारित नृत्य, एकाकिका, यांचे आयोजन शाळेकडून कारण्यात आले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी, पालक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अस्विनी कुरेकार मॅडम, तसेच आभार शेख सर,यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]