चिमूर तालुका शिवसेना तर्फ शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - संपुर्ण भारताचे आराध्य दैवत रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिमूर तालुका शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन चिमूर विधानसभा उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ शिवसैनिक  भाऊराव ठोमरे व जेष्ठ शिवसैनिक  देविदासजी गिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिवसैनिक संदिप उरकुडे यांच्या मार्फत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले असून शिवप्रतिमा भेट देण्यात आली. चिमूर येथील शिवाजी चौकात राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजा अर्चणा करुन शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत संपूर्ण चौक गाजवला. शिवसेना कार्यालयाचे उद्घाटनानंतर लगेच शिवभक्त शिवसैनिक व नागरिकांसाठी आलुभात वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना शहर प्रमुख नितीन लोणारे, उपतालुका प्रमुख केवलसिंग जुनी,विधानसभा संघटक प्रकाश नांन्हे,उपतालुका प्रमुख संजय वाकडे,चिमूर तालुका विभाग संघटक प्रमुख रोशन जुमडे, उपतालुका प्रमुख किशोर उरकुडे, विभाग प्रमुख भैय्या कारेकर,मनोज तिजारे, उपतालुका प्रमुख राजेंद्र जाधव, विभाग प्रमुख आंबोली समिर बल्की, शिवसैनिक रमेश मेहरकुरे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख व रिपोर्ट सुनिल हिंगणकर व अन्य शिवसैनिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]