उपजिल्हा रुग्णालय चिमूर ची रुग्णवाहिका अवैधरित्या प्रवासी वाहतूक करतांना मारली पलटी

जीवित हानी होता - होता टळली

वैधकिय अधिक्षकाच्या दुर्लक्षित पणामुळे घडला हा अपघात

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.०८/०२/२०२४ ला  चिमूर येथील महाराष्ट्र शासनाची उपजिल्हा रुग्णालयाची टोल फ्री क्रमांक. १०२ ची टाटा सुमो वाहन क्रमांक. एम.एच.३४ ए-७१२६ हि रुग्णवाहिका शंकरपूर मार्गे चिमूर ला रुग्ण सोडून परत येत असतांना वाटेतील मांगलगाव इथून अवैधरित्या ६ प्रवासी महिला रुग्णवाहिकेत बसवून वाहतूक करीत असतांना रुग्णवाहिका चालक संकेत हरिदास हा दारू पिऊन असल्याचे म्हटले जात आहे. दारूच्या नशेत चालक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व हा अपघात मालेवाडा येथील वळणावर दुपारी ०५:०० वाजताच्या सुमारास झाला असून या अपघातात जखमी झालेल्या प्रवासी रुग्णांना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमदर्शी दाखल करण्यात आले.या जखमींमध्ये अल्पवयीन मुलीसह महिलांचा सुद्धा समावेश आहे. शितल विकास बावणे रा.खेमजई भटाळा , अस्मिता नन्नावरे,जिना दडमल,अक्षरा दडमल,स्वेता दडमल, चंद्रकला पोईनकर, सर्व अपघातग्रस्त प्रवासी रुग्ण एकाच परिवारातील खेमजई भटाळा येथील असून वैधकिय अधिक्षक आनंद किन्नाके यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने हा प्रकार घडला असावा अशी चर्चा चिमूर शहरात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे. या सर्व प्रवासी यांना सुधीर मायकुलकर यांनी कसलीही परवा न करता स्वतःच्या मोटारसायकल ने रुग्णालयात आणले. तसेच रुग्णवाहिका ज्या घटनास्थळी पलटी मारली त्याच अवस्थेत ती रूग्णवाहिका न ठेवता पोलीस तथा RTO पंचनामा न करता ते वाहन सरळ करून चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात ट्रॅक्टर च्या सहाय्याने आणून लावले आहे. या प्रकरणात शासकीय नियमला डावलून चोरट्या मार्गाने विषय हाताळला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]