खेडी येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा

खेडी येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा 
सावली -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार पोहचविण्यासाठी पुण्यतिथी महोत्सव खेडी येथे सुभाष गुरुनुले महाराज, गिरीधर चुधरी महाराज यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
  या "भारतात बंधुभाव नित्य वासू दे, दे वरची असा दे, सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे" असा एकतेचा संदेश देणारे संत या देशात तुकडोजी महाराज होऊन गेले. ग्रामगिता ग्रंथ हा गाव उन्नत्तीसाठी लिहून शेतकऱ्यांना अर्पण करणारे व गावाकडे चला अशी हाक देणारे संत तुकडोजी महाराज होऊन गेले. गावागावात गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांचे विचार दिल्या जात आहे. नुकतेच खेडी येथे दोन दिवशीय पुण्यतिथी महोत्सव साजरा झाला. पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आली. रात्रौ चेतन ठाकरे  महाराज यांनी भारुड कार्यक्रमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या दिवशी गावातून रामधून पालखी भजन, दिंडीने काढण्यात आली यावेळी संपूर्ण गावकरी सहभागी झाले. महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम व गोपाळकाल्याने सांगता करण्यात आली.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]