विहिरीत पडून नर अश्वलाचा मृत्यू

अस्वलाचे वाचण्यासाठी धडपडणे ठरले व्यर्थ

अनेक तास जीव वाचवण्यासाठी केला प्रयत्न

मृत्यू पावलेल्या नर अश्वलाचा अखेर
अंत्यसंस्कार 

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - दिनांक.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान अस्वल चा मृत्यू झाला. रात्रोच्या वेळी तिन अस्वल वघळपेठ परिसरात संचार करीत होते. विहिरीला तोंडी नसल्याने दोन वर्षीय नर अस्वल पाहाटेच्या दरम्यान विहिरीत पडले.सकाळी विहिरीच्या सभोवताल दोन अस्वल फिरताना शेतकऱ्यांना व नागरिकांना दिसले.यामुळे काही तरी घटना घडली असल्याची शंका नागरिकांना आली.त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता विहिरीत अस्वल पडले असल्याचे दिसून आले.विहिरीत पडलेले अस्वल स्वत:ला वाचविण्यासाठी धडपडत करीत होते,यामुळे ते दमलेले होते,थकलेले होते असे नागरिकांच्या लक्षात आले.परिसरातील नागरिकांनी संबंधित वनरक्षक,यांना विहिरीत अस्वल पडले असल्याची माहिती दिली.वनरक्षक यांनी वनपाल व वनपरिक्षेत्राधिकारी यांना माहिती दिली.वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी वनविभागाची चमू घटना स्थळाकडे रवाना केली व स्वत:ही घटनास्थळी दाखल झाले.
रेस्क्यू ऑपरेशन द्वारा नर अस्वलाला वाचविण्याचा प्रयत्न वनविभागाच्या चमूने व उपस्थित नागरिकांनी केला.पण त्यांचा प्रयत्न असफल ठरला.वनपरिक्षेत्राधिकारी किशोर देऊळकर यांनी घटना स्थळावर पोहोचण्यापूर्वीच नर अस्वलाची प्राणज्योत मालवली होती.तर वन क्षेत्राधिकारी आऊतकरही घटना स्थळावर उशिरा दाखल झाले होते.मात्र हे दोन्ही अधिकारी पेट्रोलिंगच्या कामी असल्याची माहिती पुढे आली आहे.स्वत:ला वाचविण्यासाठी अनेक तास धडपडत असलेल्या दोन वर्षीय नर अस्वलाचा विहिरितील संघर्ष मन हेलावून टाकणारा होता असे प्रत्यक्षदर्शी घटनाक्रम अनुभवणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे.वाचविण्याचे प्रयत्न असफल ठरल्यानंतर मृतक अस्वलाला विहिरीतून बाहेर काढले. व चिमूर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी सुट्टी चयस कारणाने कार्यालय ठिकाणी हजर नसल्यामुळे शवविच्छेदन करण्यासाठी अस्वलाला सिंदेवाही येथे नेण्यात आले.शवविच्छेदन झाल्यानंतर अस्वलाला सिंदेवाही येथेच भावपूर्ण चिताग्नी देण्यात आली. चिमूर तालुका अंतर्गत मौजा कोटगाव गट ग्रामपंचायत आहे.या गटग्रामपंचायत मध्ये वघळपेठ शेतशिवार हा परिसर येतो.या वघळपेठ परिसरात युवराज सिताराम गुरपुडे यांचे शेत आहे.त्यांच्या शेतात बिना तोंडीची विहिर असल्याने हा सर्व प्रकार घडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]