बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम विषयक कार्यक्रम संपन्नचंद्रपूर (प्रतिनिधी)  - 
    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कौशल्यम  सभागृहात बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमा विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीआरटीसी चे  वनपरिक्षेत्र अधिकारी  आकाश मल्लेलवार, बीआरटीसीचे  प्रशिक्षक अनिल दहागावकर,  श्री. प्रवीण शिवणकर आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासेयोचे मुख्य कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर होते.  याप्रसंगी आकाश मल्लेलवार म्हणाले , आजच्या स्पर्धेच्या  काळात होतकरू तरुणांसाठी बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम लाभदायी ठरू शकतो . करिता युवकांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले . अनिल दहागावकर म्हणाले की , बदलत्या काळात पर्यावरण स्नेही जीवनशैलीकडे जगभर लोकांचा ओढा वाढत चाललेला आहे.  कुशल मनुष्यबळा अभावी पाहिजे त्या प्रमाणात या उद्योग क्षेत्राचा विकास पाहिजे तसा होताना दिसत नाही. जगात बांबूला विशेष मागणी असल्याकारणाने येणाऱ्या काळात बांबू उद्योग सहाय्यक ठरू शकतो, असे ते म्हणाले. 
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बंडोपंत बोढेकर यांनी सर्व अतिथींना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन स्वयंसेवक गौरव ठाकरे यांनी केले तर आभारप्रदर्शन ताहूर पठाण यांनी केले.  आदित्य विश्वकर्मा,  सरोज साहू ,  यशस्वी झाडे,  श्रद्धा कुमरे, परवेश कुरेशी, कोमल बावरे, व्यंकटी माने, सुनील नागरगोजे, अरहम शेख, शिवम काकडे , कुणाल कोटगले ,अथर्व नामपल्लीवार, आदर्श लोणारे आदींनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]