नागभीड - उमरेड रेल्वे कामाला गती मिळेल. (अंडरपास व वन्य प्राण्यांच्या भ्रमंतीची मार्गाची सोय करून काम होणार पूर्ण)नागपूर-नागभीड रेल्वे या जुन्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज रुंदीकरण काम चे 2020 पासून सुरू झाले होते आणि ते दोन वर्षात पूर्ण होते अपेक्षित होते. पण ५ वर्ष होऊनही काम अर्धेच झाले आहे.

देशाला उत्तर दक्षिण जोडणाऱ्या महत्वाच्या नागपूर बल्लारशाह मार्गाला नवा पर्याय आणि चंद्रपूर, उमरेड, खापरखेडा इथल्या कोळश्याला आणि आता नव्याने निघत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील लोह खनिजांच्या वाहतुकीसाठी नागपूर नागभीड रेल्वे मार्ग अतिशय महत्वाचा आहे. त्याहूनही झाडीमंडळाच्या एकूण विकासासाठी या रेल्वे मार्गाचे एकूण महत्व नव्याने सांगण्याची गरज नाही,
नागपूर ते उमरेड हे काम नीट सुरू आहे पण मध्येच नागभीड ते उमरेड या सेक्शनला वनविभागाने त्यांच्या नियमानुसार लालफितशाही केली होती. 
मधल्या काळात बदललेले राज्य सरकार विदर्भाला फार अनुकूल नव्हते आणि त्यांनी वनविभागाच्या नियमाचे कारण पुढे करून काम जवळपास थांबवले होते. 
मुद्दा असा होता की हा मार्ग  उमरेड कऱ्हाडला ये ताडोबा जंगलाला जोडणाऱ्या कॉरिडॉर मधून जातो आणि वाघांच्या कॉलर चे GPS पाहिल्यावर लक्षात आले होते की 
 नागभीड ते कम्पा, कम्पा ते भिवापूर आणि भिवापूर ते उमरेड या तीन खंडात वाघ हा रेल्वे मार्ग अनेकदा, जवळपास रोज रात्री क्रॉस करतात. त्यामळे वन्य प्रेमी आणि पत्रकारांनी आवाज उठवला होता, 

महारेल्वेने या तीन खंडात वन्यप्राणी अंडर पास बांधायची तयारी दाखवली. त्यामुळे खर्च अर्थातच वाढणार होता. त्याला आधी राज्य वाइल्ड लाईफ बोर्डाने परवानगी दिली पण 
केंद्रीय वाइल्ड लाईफ बोर्डाने त्यासाठी दोन वर्षे उशीर केला. 

शेवटी 7 फेब्रुवरी 2024 च्या त्यांच्या बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली, 
त्यानुसार नागभीड ते कम्पा, कम्पा ते भिवापूर आणि भिवापूर ते उमरेड या खंडात प्रत्येकी दोन वन्यप्राणी अंडर पास महारेल्वे बांधून देणार आहे, 
सोबतच प्राणी जाण्यासाठी पुलांच्या बांधकामात काही बदल होणार आहेत, 

यामुळे उमरेड पर्यंत पुढच्या काही महिन्यात सुरू होणारी रेल्वे वाहतूक नागभीडपर्यंत पुढच्या वर्षात सुरु होण्याची शक्यता आता वाढली आहे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]