झाडीपट्टीतील उपेक्षित कलावंताचे सरकारने मायबाप व्हावेझाडीपट्टीतील उपेक्षित कलावंताचे सरकारने मायबाप व्हावे, यासाठी सरकार पुरस्कृत दरवर्षी झाडीपट्टी सांस्कृतिक  महोत्सवाचे आयोजन करावे अशी अपेक्षा जेष्ठ नाट्यकर्मी, नाट्यलेखक प्रा.  सदानंद बोरकर यांनी व्यक्त केली. ते आज झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मुळे  मुल येथे पहिल्यांदाच शासकीय पातळीवर झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव संपन्न होत आहे. ही प्रक्रिया दरवर्षी चिरंतर राहावी यासाठी शासनाने झाडीपट्टी कलावंतासाठी महामंडळ तयार करावे,  गोंडवाना विद्यापीठाने झाडीपट्टीतील कलेचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.
पूर्व विदर्भातील झाडीपट्टीत अनेक लोककलावंत आणि लोककला आहेत. आर्थिक परिस्थितीने अतिशय नाजूक अवस्थेत जगत आहेत. या कलाकडे आणि कलाकाराकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने झाडीपट्टीतील लोककला मृत पावत असल्याची खंत प्राध्यापक बोरकर यांनी व्यक्त केली.
आयुष्यभर रंगकर्मी राहून नाट्य, लोककलेच्या माध्यमातून समाजाची सेवा, मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना अखेरच्या काळात अतिशय बिकट परिस्थितीत जगावे लागते. स्वाभिमानामुळे दुसरे कामही करता येत नाही, मात्र वृद्ध कलावंतांना देण्यात येणारे शासनाचे अनुदान अत्यंत तुटपुंजे असल्याने ते वाढविणे गरजेचे असल्याचे प्राध्यापक बोरकर यांनी सांगितले.
दिनांक 18 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी विविध लोककला  कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे. झाडीपट्टीतील अनेक ज्येष्ठ,  श्रेष्ठ कलवंतही यात सहभागी होत असल्याने रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक महामहोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
पत्रकार परिषदेला नंदू रणदिवे, अजय गोगुलवार, महेंद्र करकाडे, किशोर कापगते, प्रवीण मोहुर्ले, किशोर उरकुंडवार, संतोष वरपल्लीवार, प्रा. अनिल कामठी, प्राध्यापक चंद्रकांत मनीयार, युवराज चावरे, रवी बोकारे यासह आयोजन समितीतील कलावंत उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]