वाघाच्या हल्ल्यात जंगलात काड्या तोडायला गेलेला इसम ठार.(शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना.)
यश कायरकर,
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी, अंतर्गत येणाऱ्या शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार बीट-2 दोन कक्ष क्रमांक 254 मध्ये मृतक श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार  (51 वर्ष) राहणार पळसगाव (जाट) याला सकाळी 8:30 वाजता च्या दरम्यान वाघाने हमला करून ठार केल्याची घटना घडली.
     सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की मृतक श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार हा आपल्या नेहमीच्या काही साथीदारांसोबत जंगलातील कच्चेपार बीटा मध्ये नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास काड्या तोडायला गेला असता  काड्या गोळा करताना चालत चालत जंगलामधील नाल्यालगत पाण्याजवळ बसलेल्या वाघाच्या अचानक सामने गेल्यामुळे दचकून अचानक वाघाने हमला करून श्रीकृष्ण कोठेवार यास ठार केले. यावेळेस घटनास्थळाजवळ असलेल्या साथीदारांनी मात्र ऑर्डर करून वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र वाघाने मृतदेह 100 मीटर पर दूर पर्यंत उचलून नेला. तोपर्यंत श्रीकृष्ण हा मृत पावलेला होता सदर घटनेची माहिती वनविभागाला देताच शिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर  यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक शिंदेवाही , के.डी. मसराम ही आपली चमू घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळेस चौधरी वनरक्षक कच्चेपार बिट, चहांदे वनरक्षक डोंगरगाव बीट, पंडित मेकेवार वनरक्षक आलेवाही, फुलझले वनरक्षक शिंदेवाही बिट, तोडसाम मॅडम कारगाटा वनरक्षक, व स्वाब संस्थेचे  जिवेश सयाम, शुभम निकेशर, कैलास बोरकर, गोपाल कुंभले, यश कायरकर, मिनेश कुंभले, आदी स्वाब संस्थेचे सदस्य हे यावेळी घटना स्थळी उपस्थित होऊन शिंदेवाही पोलिसांना घटनेची माहिती दिली व मोक्का पंचनामा करून शिंदेवाही पोलिसांनी  शिंदेवाही येथे ग्रामीण आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करन्या करिता आनन्यात आले.
     पीडित परिवाराला वन विभागातर्फे तात्काळ मदत म्हणून 25,000/- (पंचवीस हजार रुपये) देण्यात आले. वन्य जीवाच्या हमल्यात मृत्यू पावल्यानंतर वन विभागामार्फत मृतकाच्या परिवाराला मिळणाऱ्या पंचवीस 25 लाख रुपये या सहाय्यता निधीतून
उर्वरित सहाय्यता निधी 24 लाख 75 हजार रुपये लवकरात लवकर वन विभागामार्फत पिडीत परिवाराला देण्यात येणार आहे. 
  "तसेच या परिसरात वाघांचा वावर असल्यामुळे लोकांनी जंगलात सरपण गोळा करायला किंवा कुठल्याही प्रकारच्या कामानिमित्त जंगलात जाऊ नये." असे वन विभागामार्फत परिसरातील लोकांना सूचना देण्यात येत आहेत. घटनास्थळी कॅमेरा लावून घटने करता कारणीभूत असलेल्या वाघाची ओळख पटन्याकरीता हालचाली वर लक्ष ठेवण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]