!! श्री गणेश जयंती निमित्त. !!!


 !!!    श्री गणेश जयंती निमित्त. !!!
           
       १३ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे.माघ शुद्ध चतुर्थी यादिवशी पृथ्वीतलावर पहिल्यांदा गणेश लहरी आल्या.म्हणुन‌ हा दिवस श्री गणेश जयंती म्हणुन साजरा केला जातो. यादिवशी नेहमीपेक्षा सहस्त्र पटीने गणेशतत्व पृथ्वीवर कार्यरत असते म्हणुन‌‌च यादिवशी आपण गणपतीची जेवढी जास्त उपासना करु तेवढ्या सहस्त्र पटीने आपल्याला त्याचा लाभ होईल. या दिवशी !!ॐ गं गणपतये नम:!! हा नामजप जास्तीत जास्त करावा. 
ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवते विषयी  जर आपल्याला शास्त्रशुद्ध माहिती असेल‌ तर त्या देवते विषयीचा आपला भाव अधिक जास्त दृढ होईल.वतेवढ्याच श्रद्धेने आपण त्याची भक्ती करू.                  आता आपण श्रीगणेशाचा श्लोक बघु या.
 !!वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ !! 
 !! नीर्वीघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!! 
वाकडी सोंड असलेला ,मोठ्या देहाचा 
 कोटी सुर्याप्रमाणे कांती असलेला, अशा देवा तु माझे सर्व‌ कार्य निर्विघ्नपणे पार पाड.


   श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे. तो सर्वांचे विघ्न दुर करतो. म्हणुनच आपण संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी करतो. तो आपल्या सर्व भक्तांचे विघ्न दुर करतो.
  श्री गणपती बुद्धीची व ज्ञानाची देवता आहे. 
 श्री गणेशाची उपासना केल्याने आपले ज्ञान व बुद्धी वाढते त्याचप्रमाणे आपली विवेकबुद्धी पण वाढते. गणपतीचे दोन प्रकार आहे. एक डाव्या सोंडेचा गणपती व  एक उजव्या सोंडेचा गणपती.
 उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे त्यांची सोंड उजवीकडे वळलेली असते. या गणपतीची पुजा करताना कर्मकांडातील सर्व नियम पाळुन करावी लागते. म्हणजे सोवळे पाळुन ,रोज २१ दुर्वा ,लाल फुल,रोज मोदक दाखवणे.आजच्या धकाधकीच्या जीवनात हे सर्व नियम पाळणे कठीण असते त्यामुळे आपल्याकडुन पुजा विधीमध्ये चुका होतात .व आपल्याला त्याचा त्रासही होतो.म्हणुन‌ पुजेमध्य डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा.                                                      डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती . म्हणजे या गणपतीची सोंड डाव्या बाजुला वळलेली असते.डावी बाजु म्हणजे चंद्राची दिशा ,ती शीतलता प्रदान करणारी असते. ती उत्तर दिशेकडे असते. उत्तर दिशा ही साधनेला पुरक अशी दिशा आहे.म्हणुन डाव्या सोंडेच्या गणपतीची पुजा करावी. 
  श्री गणेशाच्या पुजेत लाल‌ फुल, दुर्व्याचे फार महत्त्व आहे. 
गणपतीला लाल फुल का बरं वाहायचे तर लाल फुलांमध्ये गणपती तत्व आकृष्ट करण्याची शक्ती जास्त असते आणि फुल वाहताना फुलांचे देठ गणपतीकडे असावे. शक्यतो फुले देवतेच्या चरणांवर वहाव्यात. त्याचप्रमाणे दुर्वा पण वाहताना दुर्व्याची जुडीचा पातीचा  भाग आपल्याकडे व देठाच्या भाग गणपतीकडे असावा. गणपतीला दुर्वा वाहताना विषम संख्येत वहाव्यात.त्याचप्रमाणे दुर्व्याच्या पातीमध्ये  विषम संख्या म्हणजे तीन , पाच ,सात अशी असावी.
    गणपतीला मोदक फार  आवडतात .मोदक म्हणजे आनंद देणारा,  ज्याप्रमाणे मोदक खाल्याने आनंद मिळतो. त्याचप्रमाणे ज्ञान प्राप्त केल्याने आपल्याला आनंद मिळतो.ज्ञान अमर्याद आहे. गणपतीकडुन आपल्याला ज्ञान मिळवुन आनंद मिळवायचा आहे.
  त्याचप्रमाणे श्री गणेशाने पाश आणि अंकुश धारण केले आहे.पाश आणि अंकुशच्या सहाय्याने गणपती जीवसृष्टीतील विघातक शक्तींचा नाश करून आपल्या भोवती संरक्षक कवच निर्माण करतो. त्याचप्रमाणे गणपतीच्या चरणांजवळ उंदीर असतो. उंदीर हा रजोगुणाचे प्रतीक आहे.तो खुप चंचल असतो.म्हणुन गणपती त्याला आपल्या चरणाजवळ ठेवुन नियंत्रणात ठेवतो. आपल्याला सुद्धा साधनेने आपले रजोगुण नियंत्रणात ठेवायचे आहे.
  आपल्या महाराष्ट्रात  ठिकठिकाणी गणपतीचे मंदिरे आहे.  महाराष्ट्रातील गणपतीचे अष्टविनायक मंदीरे‌ तर प्रसिद्धच आहे. 
 तर चला तर मग आपण १३ तारखेला गणेशजयंतीच्या दिवशी गणपतीचा जास्तीत जास्त नामजप सहस्त्र पटीने त्याचा लाभ घेऊन त्याची कृपा संपादन करु या.
   !! गणपती बाप्पा मोरया!!
   !! ॐ गं गणपतये नमः !!
  सौ.भारती जीवन कोंतमवार,मुल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]