अॅड. पारोमीता गोस्वामी यांच्या हस्ते प्रबोधनकार मारोती साव सन्मानितवढा येथे श्रमसंस्कार शिबिरात महिला सक्षमीकरण विषयावर मार्गदर्शन


चंद्रपूर (प्रतिनिधी )-
अलिकडे काही गावात पुरूषांप्रमाणे महिला तंबाखू सेवन करताना दिसतात हे चित्र चिंताजनक आहे. असले व्यसन महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असून त्यापासून महिलांनी दूर रहावे , असे आवाहन सुप्रसिद्ध समाजसेवीका एड. पारोमिता गोस्वामी यांनी श्री क्षेत्र वढा येथे केले. युवा वर्गांनी प्रेम दिवस साजरे करण्या ऐवजी स्वतःला घडवावे आणि आई वडिलांची सेवा करून त्यांचा आधार बनावे, असेही त्या म्हणाल्या.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर श्रीक्षेत्र वढा येथे सुरू असून या शिबिरात महिला सक्षमीकरण विषयावर त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी माजी मुख्याध्यापिका सौ. संध्याताई गोहोकार, सरपंच किशोर वरारकर, माजी जि. प. सभापती चंद्रकांत गोहोकार, कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, नशाबंदी मंडळाचे संदीप कटकुरवार , शाळा व्यवस्थापन समितीचे अशोक हागे आदींची उपस्थिती होती . महिलांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. बुवाबाजीच्या नादी लागू नये.जवळपास घडणा-या घटनांकडे वैज्ञानिक दृष्टीने पहा, असे सौ. गोहोकार म्हणाल्या.
शिबिराचे प्रास्ताविक मुख्य कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले. ग्रामस्वच्छता आणि तांत्रिक मेंटेनन्स सेवा कार्य शिबिरार्थ्यांकडून उत्तम पध्दतीने सुरू असल्याचे ते म्हणाले.
     मी दारूड्या बोलतोय या आत्मकथनपर  सत्रात मारोती साव  यांनी   दारूच्या आहारी गेल्याने स्वतःच्या परिवाराची कशी  वाताहत झाली होती हे तपशीलवार   सांगून दारू सारख्या जहरापासून  सर्वांनी दूर रहावे असे कळकळीचे आवाहन  केले.  
      तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या संचालक प्रिती हिरळकर यांचे कृषी व्यवसाय व व्यवस्थापन तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन झाले. पारंपरिक शेती आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणारी शेती संबंधाने आधुनिक विचार मांडले. याप्रसंगी घुग्घुस श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रेमलाल पारधी, रासेयो विभाग प्रमुख बंडोपंत बोढेकर यांनी ही विचार मांडले . याप्रसंगी किशोर वरारकर (वढा), हरिश्चंद्र बोढे (भारोसा), मंगेश आसुटकर (उसगाव), किशोर उरकुडे (जुगाद), दिवाकर बोढे (धानोरा) यांना आदर्श शेतकरी सन्मान देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन कु. अर्पिता घागरगुंडे व सरोज साहू यांनी केले तर आभार प्रदर्शन  अनिल कुचनकर यांनी केले. तिसऱ्या सत्रात साहिल बुलबुले, पियुष ढाक आणि संच यांनी विनोदी शैलीत जनप्रबोधनपर पंचरंगी कार्यक्रम प्रस्तुत केला. त्यात त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान विषयावर प्रबोधन केले. शिबिराच्या स्वयंसेवकांनी दुपारच्या सत्रात श्री क्षेत्र वढा येथील  संगमावर जाऊन नदी पात्रात पडलेले असंख्य प्लास्टिक कचरा संकलन करून विल्हेवाट लावली . त्यामुळे नदी पात्र स्वच्छ झाले आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार, रणदिवे , लांडगे, इरदंडे , गराड, कांबळे , रोडे,उंबरकर , कोडापे, टेंभुर्णे  तसेच सहभागी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]