श्रीक्षेत्र वढा येथे रासेयो शिबिरात रंगले कविसंमेलन : कवितेचे कॅलेंडर प्रकाशन

श्रीक्षेत्र वढा येथे रासेयो शिबिरात रंगले कविसंमेलन  :  कवितेचे कॅलेंडर प्रकाशन 

वढा जि. चंद्रपूर (प्रतिनिधी)
    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिर वढा येथे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.      कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या कविता या विषयांवर कार्यक्रम अधिकारी  बंडोपंत बोढेकर यांचे अध्यक्षतेखाली सदर कविसंमेलन पार पडले. माजी शाखा अभियंता   प्रदीप अडकीने , ज्येष्ठ कवयित्री सौ. शशिकलाताई गावतुरे (मुल)  यांचे उपस्थितीत झालेल्या गझलकार  सुनिल बावणे (बल्लारपूर) यांचे बहारदार सूत्रसंचालनाने  विशेष रंगत आली. कविसंमेलनात एकूण १५ कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला  त्यात  पाच  शिबिरार्थी सहभागी झाले होते. व्यवसाय कौशल्ये, कामगार विश्व, शेतकरी जीवन, निसर्ग सौंदर्य , स्वच्छता आणि आरोग्य आदी महत्त्वाच्या विषयांवर ज्येष्ठ कवयित्री संगीता पिज्दुरकर , तनुजा बोढाले , सविता कोट्टी, जयंती वनकर, ज्येष्ठ कवी महादेव हुलके, सरपंच किशोर वरारकर , सुरज दहागावकर , स्वप्निल मेश्राम, नवोदित कवी गौरव ठाकरे, अर्पिता घागरगुंडे , कु. रिया पिपरीकर, कोमल बावरे, पूर्वा आत्राम, समिर केने, अनुज ठाकुर  आदींनी   उत्तम स्वरचित कविता सादर करून उपस्थितांना  मंत्रमुग्ध केले .  सर्व कवींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले.     यावेळी नक्षत्रांच देणं काव्यमंच पुणे द्वारा प्रकाशित कवितेच्या कॅलेंडरचे प्रकाशन  बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते करण्यात आले. या कॅलेंडर मध्ये जिल्हातील कवींच्या कविता समाविष्ट आहे. 
      शिबिराच्या सहाव्या दिवशी 
   वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यावर  मार्गदर्शन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य  आर. बी. वानखेडे होते . मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी. एम. जाधव , सर्पमित्र  विशाल रामेडवार , समाजसेवी देवराव कोंडेकर ,नारायण चव्हाण ,दुरेंद्र गेडाम, शिल्पनिदेशक बोढाले, कोडापे ,काळे आदींची  उपस्थिती होती.
      यावेळी  जाधव यांनी चमत्कारामागील विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलनावर मार्गदर्शन केले  व तथाकथित चमत्कारांबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी  विविध चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करून त्या   प्रयोगामागील वैज्ञानिक कारण  स्पष्ट करून सांगितले . 
 याप्रसंगी विशाल रामेडवार यांनी सर्पाच्या विविध जाती- प्रजाती तसेच  सापांविषयी  समाजात असलेल्या श्रध्दा - अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकला. देवराव कोंडेकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विविध कार्याची माहिती दिली.
      कार्यक्रमाचे  प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले.  सूत्रसंचालन                     गौरव ठाकरे व कोमल बावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सरोज साहू  यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]