आठवडी बाजारातील जागा वाटपाचा तिढा सुटला मुख्याधिकारी यशवंत पवार यांचा पुढाकारमूल (प्रतिनिधी)
नगर परिषदेचे मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी स्वतः पुढाकार घेत आठवडी बाजारातील जागावाटप भाजी विक्री त्यांना केल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. जागा कमी आणि विक्रेते अधिक यामुळे जागा वाटपाचा घोळ मागील पंधरा दिवसापासून सुटला नव्हता मात्र मुख्याधिकारी पवार यांनी पुढाकार घेत आज हा तिढा सोडविल्याने उद्याचा बाजार नियोजित जागेत भरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

करोडो रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या मूल येथील आठवडी बाजाराचे प्रजासत्ताक दिनी जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र व्यापाऱ्यांना जागा वाटप न केल्याने व्यापाऱ्या -व्यापाऱ्यामध्ये किरकोळ वाद होत असल्याने नगर पालीकेचे मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी पुढाकार घेत सोमवारी जवळपास 540 लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना जागा वाटप करून दिले, सदर जागा वाटपामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

येथील आठवडी बाजारात नेहमीच डुक्करांचा कळप फिरत राहत असल्याने दुर्गंधी राहात होत होती, यामुळे जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आठवडी बाजाराच्या सौदर्गीकरणासाठी 11 करोड रूपये निधी मंजूर केले, सदर निधीमधुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बांधकाम करण्यात आले. अतिशय सुसज्य असा आठवडी बाजाराचा लोकार्पण सोहळा 26 जानेवारी रोजी पालकमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला. दरम्यान 2 बुधवारी व्यापाऱ्यांनी मिळेल त्याठिकाणी आपले दुकान थाटुन व्यवसाय करीत होते, नविन ठिकाणी दुकान लावताना अनेकदा व्यापाऱ्यात वाद होत होते, कोणत्याही व्यापाऱ्यांत वाद होऊ नये व शिस्तीत व्यवसाय करण्याच्या उद्देशाने मूल नगर पालीकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी सोमवारी (दि. 13 फ्रेबुवारी रोजी) आठवडी बाजार येथे नोंदणी झालेल्या 540 व्यापाऱ्याना ईश्वर चिट्टी काढुन जागेचे वाटप करून दिले. यावेळी 63 मिरची, मसाला, मनेरी, लसूण व्यापारी, 45 आलू कांदे व्यापारी, 8 ठोक विक्रेते, त्यासोबतच रेडीमेड कापड, चप्पल विक्रेते, कडधान्य, किरकोळ विक्रेते यांनाही भिंती जवळील जागा नेमून देण्यात आली आहे. दरम्यान 8 मटण विक्रेते 14 चिकन विक्रेत, तर जवळपास 25 मासे विक्रेते यांनाही मागील आठवडयात लॉटरी पध्दतीने गाळे वाटप करून देण्यात आले आहे. सदर जागा वाटपामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

उर्वरीत शेतकरी विक्रेते, किरकोळ विक्रेत्यांना आठवडी बाजारात जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी  व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]