चनाखा येथे ग्राम फलकाचे अनावरण : भाऊ थुटे यांचे सप्तखंजिरी कीर्तन संपन्नसामुदायिक प्रार्थनेत  ग्रामोन्नतीसोबत आत्मोन्नतीच्या विचारांचे दर्शन- बोढेकर 


राजुरा ( प्रतिनिधी)- 
    येथून जवळच असलेल्या चनाखा येथे शिवजयंतीच्या शुभप्रसंगी श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच राजे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांचे अनावरण गावाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवमहोत्सव समिती आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले.  अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.तर  विचारपिठावर सरपंच सौ . रेखाताई आकनुरवार, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय प्रचार समिती सदस्य ॲड.राजेंद्र जेनेकर, राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर , सेवा मंडळाच्या जिल्हा महिला प्रचार प्रमुख ॲड.सारीका जेनेकर , जि.प. शाळेचे  मुख्याध्यापक सत्रे, विनायक सोयाम, शैलेश कावळे, उपसरपंच राजु सातपुते ,सौ. सुवर्णा कावळे,प्रकाश दुर्योधन,जोत्ना वानखेडे, सुनिता सातपुते, ग्रा.पं. सदस्या शालीना मडावी होते.
   श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून चनाखा येथे सामुदायिक प्रार्थना दैनंदिन स्वरूपात सुरू असून त्यातून ग्रामवासीयांना ग्रामोन्नती सोबत आत्मोन्नती चा मार्ग गवसेल. ग्रामजीवनाचा  तोल समर्थपणे सांभाळत नवा  परिवर्तनवादी विचार देणारा महत्त्वाचा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला आहे. एकंदरीत ग्रामगीता प्रयत्नवादाचा पुरस्कार करते , असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले. एड. जेनेकर यांनी राजुरा तालुक्यात सुरू असलेल्या सेवा मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली तर एड. सारिका जेनेकर यांनी महिलोन्नती संबंधाने विचार व्यक्त केले.
    कार्यक्रमाच्या दुसऱ्या  सत्रात सप्तखंजिरी वादक कीर्तनकार भाऊ थुटे यांचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन,  स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण,  शिक्षणाचे महत्त्व, तंटामुक्त गाव मोहीम आदी बाबत कीर्तनातून जनजागृती केली. 
        कार्यक्रम यशस्वीतेकरीता शिवजयंती महोत्सव समितीचे राहुल सातपुते ,वैभव वडस्कर,बाळु वडस्कर, शुभम सातपुते, प्रमोद वडस्कर , प्रीतम सातपुते , नरेश वानखेडे , अमोल देवाळकर , संघर्ष रामटेके, सुरज सातपुते आदींनी परिश्रम घेतले. 
     गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक मोहन वडस्कर यांनी प्रास्ताविक केले .तर  क्षीरसागर वेलादी, चेतन वडस्कर, तुषार वडस्कर, ज्ञानेश्वर साळवे, आराध्या वडस्कर , बाळनाथ वडस्कर ,प्रभाकर वडस्कर , परी वडस्कर ,वंदना मडावी, प्रकाश वडस्कर, अमोल साळवे, मनोहर वडस्कर तसेच समस्त चनाखावासीय  जनतेनी स्वच्छता अभियान, सामुदायिक प्रार्थना, ग्रामभोजन उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. 
    सूत्रसंचालन  संदिप कोंडेकर यांनी तर आभार लांजेकर गुरूजी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]