बौद्ध धम्म परिषद व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
तळोधी (बा.) 
फुले-आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभूमी बोकडडोह पळसगाव (खुर्द) नागभिड यांचें विद्यमाने (ता.१८ फेब्रुवारी) ला भव्य बौद्ध धम्म परिषद व समाज प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत मिरवणुक, धम्मध्वजारोहन, धम्मदेसना, तथा समाज प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जयभिम मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम दिल्ली, खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडिया, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, सामाजिक कार्यकर्त्या चंदा मंगर, शिक्षण महर्षी मारोतराव कांबळे ब्रम्हपूरी, यांचें प्रमुख उपस्थितीत  समाज प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांत परिसरातील होतकरू मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर रात्रौ बुध्द फुलें भिम गीतांवर समुह नूत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमांचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फुले आंबेडकर स्मारक समितीचे सचिव अँड.पी.डी. काटकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]