सुगंधित तंबाखूची वाहतूक करतांना भाजपचे पदाधिकारी अटकेत

११ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

भाजपचे महामंत्री फरार

सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.१५/०३/२०२४ ला सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हेटी पोलीस चौकी याठिकाणी गस्त सुरू असताना API मुसनवार यांनी रात्री ०९:०० वाजता वाहन क्रमांक. MH34 BR 1331 या पांढऱ्या रंगाची भाजप चा झेंडा लावून असलेली अर्टिका कार ची तपासणी केली असता ३ लाख १ हजार रुपयांचा सुगंधीत तंबाखु व ८ लाख रुपयांची कार जप्त केली.असून कलम २७२,७३,१८८,३२८ व अन्न सुरक्षा कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये चिमूर शहरातील भाजप चे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांचे अगदी जवळचे नामांकित निकटवर्तीय भाजप चे पदाधिकारी व नंदिनी ट्रॅव्हल्स चे मालक नरेंद्र राजाराम हजारे वय ३८ वर्षे राहणार चिमूर , पंकज मनोहर गोठे वय २३ वर्षे राहणार चिमूर तसेच रोशन मधुकर बनसोड भाजपा युवा मोर्चा चे तालुका महामंत्री तसेच खडसंगी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राहणार खडसंगी वय ३० वर्षे अशी तिघांवर सुगंधित तंबाखू व गुटखा सह मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली. यातील भाजप चे महामंत्री रोशन बनसोड हे फरार असल्याने त्यांची सावनेर पोलीस यांचेकडून कसून तपासणी करीत आहेत. यामध्ये या तिघांच्या व्यतिरिक्त आणखी मोठे भाजपचे पदाधिकारी असल्याचीही चर्चा चिमूर तालुक्यात सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]