स्व.श्री.दादासाहेब वासुदेवरावजी चांगरे साहेबांची  जयंती संपूर्ण  राज्यात साजरी कराण्याचे केले आव्हान- श्री.दिलीप शिवप्रसाद चांगरे ,
(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)

या महाराष्ट्र राज्यातील तमाम सफाई कामगार व सफाई कामगारांचे नेते विवीध कामगार संघटना यांना माझा नमस्कार 
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस (७२६२) स्वतंत्र कामगार संघटना आमचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत कर्मवीर दादासाहेब वासुदेवरावजी चांगरे साहेब माजीआमदार यांच्या आशिर्वादाने व राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री चरणसिंगजी टाक साहेब यांच्या मार्गदर्शनाने  आम्ही राज्यातील सफाई कामगारांच्या न्याय हक्का साठी सर्व पदाधिकारी शासनाशी लढा देत आहे 
ज्या प्रमाणे लाड पागे समीती  1972 ला निर्माण झाली व त्याची अमलबजावणी ही 1975 पासून सुरु झाली व आज पर्यंत सारखी सुरु आहे. ही सर्व लढाई महाराष्ट्र शासनाशी आमचे दिवंगत कामगारांचे मसीहा लाड पागे समीती चे जनक कामगार नेते माजी आमदार वासुदेवरावजी चांगरे साहेब व त्यांचे सहकारी यांच्या अथक प्रयत्नांनी सफाई कामगारांना न्याय मिळवून दिले व  ज्या समाजाने डोक्यावर मल मुत्र वाहले आहे व त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन या शासनाने केलेले नाही म्हणून आमच्या या मागासलेल्या वंचित समाजाला लाड पागे समीती च्या शिफारशी लागु करुन शासनाने संजीवनी दिली आहे.
 स्व.श्री.वासुदेवराव चांगरे साहेबांची जयंती दि.15/03/2024 रोजी अकोला शहरात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व तमाम प्रदेश पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी व तसेच तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थित मोठया हर्ष-उल्हासाने साजरी करण्यात आली.
याच शृंखला मध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटन शाखा चंद्रपुर द्वारा दिवंगत कर्मवीर दादासाहेब वासुदेवरावजी चांगरे साहेब यांची जयंती उपलक्षी चंद्रपुर शहरात सफाई कामगार सभेचे आयोजन करुन दि.17/03/2024 रोजी साहेबांची जयंती साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमस स्थानिक पातळीवर जे प्रतिसाध स्थानीकांकळुन मिळाले ते प्रत्यक्ष प्रशंसात्मक आहे व संघटनेला बळकट करणारे आहे.
या करिता अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटन शाखा चंद्रपुर चे जिल्हा अध्यक्ष श्री.सुनिल महातव,संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विजय मोगरे,प्रदेश सचिव श्री.सतिश असरेट, जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अरविंद बक्सरिया 
वरिष्ठ समाज सेवक श्री.त्रिलोक बीरीया व जिल्हा संघटक श्री.सुनिल राठोड ,श्री.साहिल मालिक,श्री.सागर महातव व समस्त चंद्रपुर शाखा पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
यावेळी मी श्री. दिलीप शिवप्रसाद चांगरे 
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष च्या नात्याने संघटनेच्या तमाम प्रदेश पदाधिकारींना,सर्व जिल्हा अध्यक्षांना व सर्व तालुका अध्यक्षांना
आव्हान करतो की अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस (७२६२) स्वतंत्र कामगार संघटना आमचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत कर्मवीर दादासाहेब वासुदेवरावजी चांगरे साहेब यांची जयंती पुढील वर्षापासुन महाराष्ट्र राज्यात आप-आपल्या जिल्ह्यात,शहरात,गावात मोठया उत्सहाने साजरी करावी.
धन्यवाद.

आपला,
श्री.दिलीप शिवप्रसाद चांगरे 
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]