चोरी करणाऱ्या दोन युवकांना अटक

चोरी करणाऱ्या दोन युवकांना अटक


तळोधी बा.------दि. 29/02/24 रोजी तळोधी पोस्टे येथे श्री. संजय दिवाकर कामडी रा.वाढोणा यांचे कडुन तक्रार प्राप्त झाली की, दि. 27/02/24 रोजी चे रात्री दरम्यान त्यांची हॉटेल कोनीतरी अज्ञात चोरट्यांनी फोडुन त्यातुन गॅस सिलेंडर , सिगरेटचे पाकीटे , निसर्ग सुपारी पुडे, व नगदी चिल्लर रक्कम असा एकुण 4,275 रुपयांचा माल चोरुन नेला  आहे. सदर तक्रारीवरुन तळोधी पोस्टेस अप क्र. 28/24  कलम 457,380 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येवुन सदर गुन्ह्याचा तपास करता गोपनिय माहीती व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर चोरीचा उलगडा करण्यात येवुन आरोपी नामे 1.शुभम पुरुषोत्तम नागोसे वय. 24 रा. सिंदेवाही  यास  दि. 01.03.24 रोजी अटक करुन  गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल कि 3,900/- रु व गुन्ह्यात वापर करण्यात आलेली मारोती स्विफ्ट कार क्र. MH 32 AH 1767 किमंत 6,00,000/- लाख रु असा एकुण  6,03,900/- रु  किंमतीचा ऐवज जप्त  करण्यात आला असुन त्याचा साथिदार नामे पारस प्रभाकर लिंगायत वय. 21 धंदा - शिक्षण रा. सिंदेवाही  यास देखिल ताब्यात घेण्यात आले आहे.सदर मुले ही चांगल्या घरातील असुन केवळ मौजमज्जा करण्यासाठी त्यांनी अशाप्रकारे अपराध केला असुन त्यांच्याकडुन अधिक तपास  करणे सुरु आहे. आरोपी  नामे शुभम पुरुषोत्तम नागोसे वय. 24 रा. विद्या नगर , सिंदेवाही  यास आज रोजी त्याची पोलीस कस्टडी संपल्याने मा.न्यायलयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे . 
           सदर कारवाई मा.उपविभागाीय पोलीस अधिकारी दिनकर ठाेसरे सा. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अजितसिंग देवरे , पोउपनि गोवर्धन ,  पोहवा रत्नाकर देहारे , पोहवा मंगाम व  नापोशि / सचिन साखरकर अशांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]