व्याहाड खुर्द - गांगलवाडी रस्त्यासाठी ६०० कोटी मंजूर - विरोधीपक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाला यश

 व्याहाड खुर्द - गांगलवाडी रस्त्यासाठी ६०० कोटी मंजूर - विरोधीपक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाला यशसावली - व्याहाड खुर्द ते गांगलवाडी या रस्त्याचे कामासाठी ६०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून विरोधीपक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

   सावली तालुक्यातील  व्याहाड खुर्द ते ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी रस्ता खराब झाल्याने प्रवाशांची फार गैरसोय होत होती. सावली तालुका हा करोली आकापूर पर्यंत विस्तीर्ण असल्याने तालुक्याचे ठिकाणी या मार्गांवरून नेहमी वर्दळ असते. त्यामुळे हा मार्ग होणे आवश्यक आहे याची गरज लक्षात घेता या भागातील आमदार विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने शासन दरबारी  पाठपुरावा केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत व्याहाड निफंद्रा गांगलडी या मार्गांसाठी ६०० कोटी मंजूर करण्यात आले. यामुळे सावली ते ब्रम्हपुरी प्रवास करणे सोयीचे होणार असल्याने वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]