बारव्हा गावामध्ये कायदेविषयी मार्गदर्शन कार्यशाळा....

बारव्हा गावामध्ये कायदेविषयी मार्गदर्शन कार्यशाळा....

 वरोरा...जगदीश पेंदाम 

तालुक्यातील बारव्हा येथे आदर्श गाव प्रकल्प व सकल्प समिती विचार विकास सामाजीक संस्था .कोरो इंडिया यांच्या सयुक्त विघमाने महीला कायदेविषय कार्यशाळा दिंनाक 9 मार्च 2024 ला सेवा सहकारी संस्थेच्या हाॅल मध्ये घेण्यात आली 
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रां प सदस्य वैशालीताई ढोबळे उदघाटक कोरो इंडिया विदर्भ समनवयक अनिताताई घुर्वे मॅडम तर प्रमुख पाहुणे संगिताताई हेलोडे  सहायक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन वरोरा, वैशालीताई वराडे समुपदेशक कौटुबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र वरोरा, ग्रामसेवक गोविदराव ठोंबरे, वि.वि.सा.स.सचिव किशोरजी चौधरी व इतर मान्यवर तसेच गावातील महीला उपस्थित होत्या
  गासरुट नेतृत्व विकास कार्यक्रम 2023/2024 अर्तगत महीला कायदेविषयक  माहीती कार्यशाळा घेण्यात आले या कार्यशाळेत महीलाना पोलीस यत्रंणेबाबत माहीती व्हावी, कौटुंबिक हिसाचार बाबत, किमान काही कायदे, पोलिसांबद्दल असलेली भिती याबद्दल या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले यावेळी वराडे मॅडम यांनी कुटूबात  पती पत्नि मध्ये होणारे गैरसमजुती, तानतणाव दिसते ते दुर झाले पाहीजेत घरामध्ये सुसंवाद झाला पाहीजेत सगळ्यांनी एकमेकांशी बोलले पाहीजेत असे मार्गदर्शन केले. हेलोडे मॅडम  सा. पोलीस निरिक्षक यांनी  महीलाना अनेक कायद्याविषयी, कौटुंबिक अत्याचार, यावर त्यांनी चांगले मार्गदर्शन केले. घुर्वे मॅडम यांनी महीलाना विवाह नोंदणी व संयुक्त घर मालकी महत्वाची आहे त्याबद्दल त्यानी मार्गदर्शन केले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]