वनपरीक्षेत्र अधिकारी विरुटकर यांची बदली - नवे अधिकारी धुर्वे होणार रुजू

वनपरीक्षेत्र अधिकारी विरुटकर यांची बदली - नवे अधिकारी धुर्वे होणार रुजूसावली - वनपरीक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर यांची बदली झाल्याने त्या जागी विनोद धुर्वे हे रुजू होणार आहेत. 
        सावली वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून प्रवीण विरुटकर यांचा कार्यकाळ वादात राहिलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात वाघाचे हल्ले वाढले होते, अनेकदा विनपरवानगी गैरहजर राहत होते. मानव वण्यजीव हल्ले रोखण्यासाठी अपयशी ठरल्याने मागील 6 महिन्यापासून त्यांचेकडील प्रभार काढून वैभव राजूरकर यांचेकडे प्रभार दिला होता. वन्यप्राण्यांचे मानवांवरील होणारे हल्ले, रानडुकरांकडून शेतीची होणारी नासधूस यावर उपाययोजना करण्यासाठी कायमस्वरूपी वनपरीक्षेत्र अधिकारी येणे गरजेचे असल्याने ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेले विनोद धुर्वे यांची सावली येथे विनंती बदली झाली आहे. विनोद धुर्वे यांनी सावली येथे वनपाल या पदावर अनेक वर्ष काम केल्याने परिसराचा अभ्यास आहे. धुर्वे हे वन्यप्राण्यांकडून होणारे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजना करतील अशी आशा नागरिकांची आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]