थेरगाव येथील भाजपचे सरपंच काँग्रेसमध्ये दाखल - विरोधीपक्षनेते वडेट्टीवार यांचे उपस्थितीत पक्षप्रवेश

थेरगाव येथील भाजपचे सरपंच काँग्रेसमध्ये दाखल - विरोधीपक्षनेते वडेट्टीवार यांचे उपस्थितीत पक्षप्रवेश
सावली :- राज्याचे विरोधी पक्षनेते सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवीत थेरगाव येथील सरपंच सुधीर शेरकी यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकित काँग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्तासह पक्षप्रवेश केला. 
   गावाचा विकास करण्यासाठी त्या भागातील नेतृत्वाची गरज असते. सद्या या भागाचे नेतृत्व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेकडे आहे. त्यामुळे त्त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन  थेरगाव येथील सरपंच सुधीर शेरकी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर तथा उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर दिनेश चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे सभापती हिवराज शेरकी, चिचबोडी येथिल सरपंच सतीश नंदगीरवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार तसेच आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी सावली तालुक्यातील अनेक भाजपाचे सरपंच व पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती विरोधी पक्षनेते व सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]