मंगरमेंढा शिव मंदिरात महाशिवरात्री यात्रा - विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

 मंगरमेंढा शिव मंदिरात महाशिवरात्री यात्रा - विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती


सावली - तालुक्यातील मंगरमेंढा नीफंद्रा मार्गावरील शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य  दोन दिवशीय यात्रेचे आयोजन दिनांक 8 मार्च ते 9 मार्च पर्यंत दरवर्षी प्रमाणे यंदाही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.   आठ मार्च ला घटस्थापना आणि नऊ मार्चला गोपाळ काला चे आयोजन करण्यात आले होते.  या परिसराचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री खुशाल लोडे यांच्या नेतृत्वात गोपाळ काला चे वितरण करण्यात आले. 

      राज्याचे विरोधी पक्षनेते मान नाम विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांनी दर्शन घेऊन यात्रेतील जनतेशी संवाद साधला. दुसऱ्या दिवशी  गोपाळ काला करून जतात्रेची सांगता करण्यात आली. जवळ पास सात ते आठ हजार भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात दर्शन घेतले. नियोजन समितीच्या वतीने भाविक भक्तांना कुठली अडचण येणार नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संचालक श्री खुशाल लोडे यांच्या नेतृत्वात आणि पाथरी पोलिस यांच्या वतीने भाविक भक्तांची   काळजी घेण्यात येत होती.  अशी माहिती या परिसराचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री खुशाल लोडे यांनी दिली.


         राज्याचे विरोधी पक्षनेते मान नाम विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या वतीने महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते.  या वेळी संचालक श्री खुशाल लोडे, अशोक यंपलवार, यशवंत बोडे, गंडाटे, नथुजी नागोशे, खेडेकर गुरुजी, नानू महाराज मुंघाटे,  श्रीकांत संगिडवार, दुष्यंत मंगर आदी मंदिर समिती चे अध्यक्ष, सचिव सदस्य आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]