नव्वदी ओंलाडलेल्या वृध्दांची आज होणार परिक्षा.. परिक्षा केंद्र सज्ज.. जाणून घ्या कारण

नव्वदी ओंलाडलेल्या वृध्दांची आज होणार परिक्षा.. परिक्षा केंद्र सज्ज.. जाणून घ्या कारण  • विजय सिध्दावार 

केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत निरक्षर म्हणून नोंदविल्या गेलेल्या सर्वांची आज 'साक्षरता परिक्षा' होणार आहे.  यासाठी परिक्षा केंद्रही सज्ज करण्यात आले असून, या केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांसह परिक्षकांचीही नेमणूक केली गेली आहे.  विशेष म्हणजे, नव्वदीच्या पुढे गेलेले निरक्षरांनाही साक्षरतेची परिक्षा द्यावी लागणार आहे. Nav Bharat Saksharta Abhiyan #Litercy 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि 2021-22 च्या अर्थसंकल्पीय घोषणांच्या अनुषंगाने प्रौढ शिक्षणाच्या सर्व पैलूंचा समावेश करण्यासाठी सरकारने आर्थिक वर्ष 2022-2027 या कालावधीसाठी “नवीन भारत साक्षरता कार्यक्रम (नव भारत साक्षरता कार्यक्रम)” मंजूर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रौढ शिक्षण आणि आजीवन शिक्षण यासंबंधीच्या शिफारशींचा समावेश आहे. 2027 पर्यंत हे अभियान राबवून 100 टक्के साक्षरता करावयाची आहे. या योजनेवर केंद्र सरकारकडून 1037.90 करोड रूपये खर्च करणार आहे. #Central Government #National Education Policy

सुरूवातीला 15-35 वयोगटातील निरीक्षरांना लोकांना साक्षर करण्यांचे प्राधान्याने ठरविण्यात आले होते, या टप्यानंतर 35 वर्षे व त्यावरील लोकांना साक्षर केले जाईल असे सांगण्यात आले, मात्र आता प्रत्यक्षात नोंदविलेल्या सर्वच निरीक्षकांना साक्षरेतेचे धडे शिक्षक व शिक्षकांनी तयार केलेल्या स्वयंसेवकांमार्फत द्यावयाचे होते व असे शिक्षीत झालेल्या निरीक्षरांची आज परिक्षा घेण्यात येणार आहे.  शिक्षकांनी या अभियान अंतर्गत नोंदविलेल्या निरीक्षरांत 90 वर्षापेक्षाही अधिक वयाचे निरीक्षर असून, अशांनाही निरोप देवून त्यांना परिक्षा केंद्रावर आणून परिक्षा घेण्याचे आदेश असल्यांने, अनेक वृध्दांची आज परिक्षा होणार आहे.

शिक्षकांचा विरोध मात्र.... !

या अभियानास अनेक शिक्षकांनी, शिक्षक संघटनांनी सुरूवातीला विरोध दर्शविला. अनेक व्हाट्सअप समुहात याविरोधी प्रतिक्रियाही नोंदविल्या, मात्र केंद्र सरकारचा 'बडगा' असल्यांने, हा विरोध फारसा टिकला नाही उलट, ज्यांनी या अभियानावर प्रतिकुल प्रतिक्रिया दिली, त्यांचेवर शिक्षण विभागाने कारवाई केल्यांने, शिक्षकांतही कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.

ज्यांना शाळा शिकायची आहे, अशा शाळेत येणार्या विद्यार्थाना वार्यावर सोडून, ज्यांची अर्धी लाकडे स्मशानात गेली आहे, अशांना साक्षर करून कोणता विकसीत भारत करण्यांचा केंद्र सरकारचा संकल्प आहे? अशी प्रतिक्रीया उमटत आहे.

निरक्षर म्हणून नोंदविले गेलेले सर्वच निरीक्षर परीक्षा केंद्रावर आले पाहिजे याकरीता, दोन दिवसापूर्वीच सर्व शिक्षकांनी ते नोंदविलेल्या निरक्षरांच्या घरी जावून, परिक्षेला हजर राहण्यांची विनंती करीत होते, या वयात आता कशाची परीक्षा घेता, नातू—पणतूला शिकवा असे जरी निरीक्षर वृध्दांनी सांगीतले तरी, शिक्षकांनी हात जोडून त्यांना परिक्षेसाठी तयार करीत असल्यांचे दृष्य चित्तवेधक होते. परिक्षा देणारे सर्वच निरक्षरांची 'उल्हास अॅप'वर नोंदणी करण्यात आली आहे.  या कामात कोणीही हयगय करू नये यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. सक्तीने उपस्थित राहण्याचे आदेश निर्गमीत केले असून, कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांची, शिक्षकेत्तर कर्मचार्याची रजा मंजूर करू नये असे आदेशात नमुद केले आहे.  वृध्दांच्या परिक्षेत अडथळा येवू नये यासाठी शिक्षण विभागाच्या मॅराथान बैठका सुरू आहे.

ज्यावेळी निरक्षरतेचा सर्वेक्षण झाला, त्यावेळी निरक्षर असलेले अनेक वृध्द या दरम्यान मृत्यूही पावले हे उल्लेखनीय!

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]